Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात 'बच्चन' आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात 'बच्चन' आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात 'बच्चन' आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 28, 2024 08:42 AM IST

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या नावापुढे बच्चन हे आडनाव लावण्यात आलेले नाही. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

aishwarya rai abhishek bachchan
aishwarya rai abhishek bachchan

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही विशेष ओळखली जाते. ऐश्वर्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिचा नवरा म्हणजेच अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. या दोघांच्या नात्याबद्दल विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नांचा निषेध केला होता. पण या प्रकरणी हे दाम्पत्य अजूनही मौन बाळगून आहे. दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय झालं?

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच दुबईत 'ग्लोबल वुमन्स फोरम २०२४' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कार्यक्रमातील ऐश्वर्याच्या लूकने सर्वांना घायाळ केले होते. तसेच या कार्यक्रमात जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा तिच्या मागे स्क्रीनवर तिचं नाव आलं, जे पाहून चाहते थक्क झाले. तिच्या नावापुढे म्हणजेच ऐश्वर्या रायच्या पुढे 'बच्चन' आडनाव मिस होतं. तेवढ्यात नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी वेगवेगळे अनुमान लावण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

सोशल मीडियावर दुबईमधील या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, 'अखेर ब हा शब्द तिच्या नावातून काढून टाकला' असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने, 'अशा प्रकारे कमबॅक करण्याची तिला गरज आहे' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'केवळ ऐश्वर्या राय इतकेच नाव पुरे आहे' अशी कमेंट केली आहे.
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

ऐश्वर्याचा घायाळ करणारा लूक

ऐश्वर्या राय बच्चन प्रत्येक वेळी आपल्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. यावेळीही दुबईच्या इव्हेंटमध्ये तेच पाहायला मिळालं. 'ग्लोबल वुमन्स फोरम २०२४'च्या कार्यक्रमात ऐश्वर्या नेहमीप्रमाणे स्टेजवर पोहोचली. या कार्यक्रमात ऐश्वर्याने गडद निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये एक ट्रेल होता. त्याचबरोबर तिने एम्ब्रॉयडरी जॅकेट घातले होते, ज्यामुळे तिचा ड्रेस अधिकच सुंदर दिसत होता. बोल्ड आय मेकअप आणि हलक्या रंगाच्या लिपस्टिक ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत होती.

Whats_app_banner