मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘पाजी आज एक पेग जास्त झाला वाटतं’, कपिल शर्माचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना सुचले जोक! तुम्ही पाहिलात का?

‘पाजी आज एक पेग जास्त झाला वाटतं’, कपिल शर्माचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना सुचले जोक! तुम्ही पाहिलात का?

Jun 30, 2024 02:21 PM IST

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पहिला सीझन संपल्यानंतर कॉमेडी किंग कपिल शर्मा आता मोकळा वेळ घालवत आहे. आता त्याला विमान उडवताना पाहून नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Kapil Sharma Flying Plane
Kapil Sharma Flying Plane

कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर परतला, तेव्हापासून चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. कारण, प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा आवडता कॉमेडी शो पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला आला होता. या शोमधून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पहिला सीझन संपला असून कपिल शर्मा क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. कॉमेडी किंगने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तो विमान उडवताना दिसत आहे.

नेहमीप्रमाणे कपिल शर्माने या व्हिडीओला कॉमिक स्टाईलमध्ये कॅप्शन दिले आहे. कपिल शर्माने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आज विमान तुमच्या भाऊ उडवणार आहे.’ या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा को-पायलट सीटवर बसलेला दिसत आहे. त्याच्या मागे बसलेली व्यक्ती आजूबाजूची दृश्ये कॅमेऱ्यात कैद करत असताना, तो हसताना दिसला आहे. विमानाच्या टेकऑफपासून ते हवेचा आनंद घेण्यापर्यंत आणि नंतर लँडिंगपर्यंत कपिल शर्माने व्हिडीओमध्ये सगळ्याची झलक दाखवली आहे. तर, या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक देखील मजा घेताना दिसले आहेत.

sai tamhankar : ‘भूमिका मिळेल, पण तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल’; सई ताम्हणकरला कुणी केला होता मेसेज?

कमेंट सेक्शनमध्ये लोक काय म्हणाले?

एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘सर भाभी जी को कहाँ छोड़ दिए आप? घर जाईये, ये आपके लिये अच्छा नही है!’. एका व्यक्तीने लिहिले ली, ‘बघा, ते लाल बटण दाबू नका.’ एका युजरने लिहिले की, ‘पाजी लँड करायला येतं ना?’ कपिल शर्माच्या एका फॉलोअरने त्याच्या पोस्टवर लिहिलं की, ‘विमान पण गंमतीत उडू लागलं.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘पाजी आज एक पेग जास्त झाला आहे का?’ एका युजरने मजेशीर स्टाईलमध्ये लिहिलं की, ‘सावकाश पाजी. आम्ही पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.’

ट्रेंडिंग न्यूज

कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर परतणार!

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर कपिल शर्माचा हा दुसरा प्रोजेक्ट होता. याआधी तो एका स्टँडअप शोमध्ये दिसला होता, ज्यात त्याने लोकांचे भरपूर मनोरंजन केले होते. हा शो जगभरात खूप लोकप्रिय झाला आणि त्यानंतर आता नेटफ्लिक्सने असा शो आणला ज्यात कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर बऱ्याच काळानंतर एकत्र परतले. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात एका विमान प्रवासादरम्यान भांडण झाले होते, त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते.

WhatsApp channel