Shraddha Kapoor Video Viral: बॉलिवूडची क्यूट आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या 'स्त्री २' चित्रपटाच्या जबरदस्त यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात राजकुमार रावची श्रद्धासोबतची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली होती. याशिवाय पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या कॉमेडीनेही चित्रपटात खूप धमाल उडवली. 'स्त्री २'नेही बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. ८५० कोटींची कमाई करून अनेक हिट चित्रपटांचा विक्रम मोडला. दरम्यान, 'स्त्री २' फेम श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याला सेल्फी घेताना पाहून श्रद्धाला अचानक धक्का बसला आहे.
श्रद्धा कपूर नुकतीच विमानतळावर दिसली. यावेळी तिला पाहून पॅपराझी नव्हे तर चाहत्यांनीही अभिनेत्रीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. मग एक चाहता श्रद्धाकडे येतो आणि तिच्यासोबत सेल्फी काढू लागतो. अभिनेत्रीची नजर तिच्या चेहऱ्यावर पडताच ती आश्चर्यचकित झाली. कारण त्या चाहत्याचा चेहरा पाहून श्रद्धा चकीत झाली आहे. कारण तो चाहता श्रद्धाच्या कोस्टार सारखा दिसतो.
खरं तर श्रद्धा कपूर चाहत्याचा लूक पाहून गोंधळली. कारण श्रद्धाला तो चाहता आदित्य रॉय कपूरसारखा दिसत आहे. तो आदित्य तर नाही ना असे श्रद्धाला दोन मिनिटे वाटले. त्यामुळे श्रद्धा ही आदित्यकडे पाहात राहाते. श्रद्धा आणि आदित्यने 'आशिकी २' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या चाहत्याचे रूप आदित्यसारखेच होते. त्यामुळे ती गोंधळून गेली. या दरम्यान श्रद्धाची फॅनसोबतची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
श्रद्धाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. चाहतेही यावर कमेंट करत मजेशीर कमेंट्स करत आहेत. अनेक युजर्स आदित्यचं नाव लिहून कमेंटही करत आहेत. एका यूजरने कमेंट करत श्रद्धाला आदित्य असल्याचे वाटत आहे अशी कमेंट केली हे. तर दुसऱ्या एका यूजरने ती खात्री करुन घेते नेमका हा कोण आहे? असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या