Malaika And Arjun Visit Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र लीलावती हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने सेलेब्स त्याला भेटण्यासाठी येत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका यांना हॉस्पिटलमधून एकत्र येताना पाहून दोघांचे चाहते सोशल मीडियावर अंदाज बांधत आहेत की, कदाचित दोघांचे पॅचअप झाले असावे. तर, काही लोक त्यांच्या या नात्याला आता काय नाव द्यायचे, असे विचारात आहेत.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसत आहेत. या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत. चाहते म्हणत आहेत की, या दोघांचे पॅचअप झाल्यासारखे वाटत आहे. या दोघांना एकत्र पाहून लोक कमेंट सेक्शनमध्ये आनंद व्यक्त करत आहेत.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती. बराच काळ मलायका किंवा अर्जुनने ब्रेकअपच्या बातमीवर एक चकार शब्दही काढला नाही. मात्र, ‘सिंघम अगेन’च्या एक प्रमोशन कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूरने आपण सिंगल असल्याचे म्हणत ब्रेकअपची पुष्टी केली होती. त्याने थेट आपलं नातं तुटल्याचं म्हटलं नव्हतं. मात्र, त्या दोघांचं एकत्र न दिसणं, आणि अर्जुनचं हे बोलणं चाहत्यांना सारं काही सांगून गेलं.
अभिनेता सैफ अली खानबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या घरात एक व्यक्ती घुसली होती. चोरी करण्याच्या उद्देशाने हा व्यक्ती घरात घुसला होता, मात्र नंतर त्या व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. सध्या सैफ रुग्णालयात दाखल असून, त्याच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे. आणखी २-३ दिवसांनी अभिनेत्याला घरी सोडण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या