मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

Viral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2024 09:46 AM IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता चाहत्यांसोबत मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला आहे. इतकंच नाही, तर यावेळी कार्तिक चाहत्यांसोबत सेल्फी काढतानाही दिसला आहे.

अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल
अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, याशिवाय हा अभिनेता रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या अभिनेता त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता चाहत्यांसोबत मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला आहे. इतकंच नाही, तर यावेळी कार्तिक चाहत्यांसोबत सेल्फी काढतानाही दिसला आहे. कार्तिक आर्यन हा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. त्याची एक झलक मिळवण्यासाठी चाहते आतुर असतात. आता स्वतः कार्तिक आर्यन मेट्रोतून सफर करतोय म्हटल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेता काळ्या आऊटफिटमध्ये मास्क लावून उभा आहे. त्याचवेळी त्याचे चाहतेही आपल्या आवडत्या स्टारला इतक्या जवळून पाहून खूप आनंदी झालेले दिसत आहेत. मेट्रोमध्ये कार्तिकसोबत अनेक चाहत्यांनी फोटोही काढले. हा व्हिडीओ शेअर करताना पापाराझी विरल भयानी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ऑडिशन्ससाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यापासून ते शूटसाठी सार्वजनिक प्रवासापर्यंत, कार्तिक आर्यनचे आयुष्य त्याच्या संघर्षमय दिवसांनीच परीपूर्ण झाले आहे. आज कार्तिक त्याच्या शूटला जाताना ट्रॅफिक टाळण्यासाठी मेट्रोमधून प्रवास करताना दिसला.’ अभिनेता कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर आईशी वाद झाले अन् मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता! मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांची आतुरता

कार्तिक दिग्दर्शक अनीस बज्मीच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया ३'मध्ये झळकणार आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक शेवटचा 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती.

'भूल भुलैया ३' व्यतिरिक्त कार्तिक कबीर खानच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथेत मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकने ४ मे रोजी डबिंग स्टुडिओच्या ट्रेलरची झलकही शेअर केली होती. कबीर खान दिग्दर्शित हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असणार आहे.

IPL_Entry_Point