Urfi Javed Harassed: देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांवरील बलात्काराच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्याचवेळी मल्याळम इंडस्ट्रीतील प्रकरणे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मनोरंजन क्षेत्रातही महिलांच्या शोषणाच्या कहाण्या समोर येत आहेत. दरम्यान, आता उर्फी जावेदही अशाच एका घटनेची शिकार झाली आहे. अलीकडेच या अभिनेत्रीसोबत सार्वजनिकरित्या गैरवर्तन करण्यात आले आहे. ज्याची पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. उर्फी जावेदने आता तिच्यासोबत हे अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर आपला राग व्यक्त केला आहे.
उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीतून दोन पोस्ट शेअर केल्या आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, त्याचा निषेध व्यक्त केला. उर्फीने एक नोट शेअर केली आणि सांगितले की तिच्यासोबत कधी, कुठे आणि काय झाले? उर्फी जावेदने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘काल माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत खूप अस्वस्थ करणारी गोष्ट घडली, जेव्हा मी पापाराझींसोबत होतो, तेव्हा मुलांचा एक गट तिथून गेला आणि एका मुलाने ओरडून सर्वांसमोर मला विचारले की, 'तुझा बॉडी काऊंट किती आहे?'
उर्फी जावेद आणि तिचे कुटुंबीय तिच्या प्राईम शो 'फॉलो कर लो ना यार'चे प्रमोशन करत आहे. उर्फी प्रकाशझोतात आल्यापासून ती ट्रोलिंगला बळी पडली आहे. आता तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेले हे स्टेटस थोडे धक्कादायक आहे. उर्फीने लिहिले आहे की, अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने तिच्या शरीरावर घाणेरडी कमेंट केली. त्यावेळी तिची आईही तिथे उपस्थित होती.
उर्फी जिथे जाते, तिथे तिला पापाराझी घेरतात. नुकतेच फोटो काढताना तिच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. उर्फीला एका मुलाने तिचा बॉडी काऊंट विचारला. त्या मुलाच्या बोलण्याचा रोख किती व्यक्तीसोबत सेक्स केलास, असा होता. हा मुलगा जेमतेम १५ वर्षांचा होता आणि त्याने हे कृत्य उर्फीच्या आई आणि तिच्या कुटुंबियांसमोर केले आहे. उर्फी सतत काहीना काही पोस्ट करत असते. मात्र, तिच्या पोस्टच्या कमेंट सेक्शन आणि इन्स्टाग्रामवरही अनेक जण तिच्यावर अश्लिल कमेंट्स करत असतात. तिला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.