मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; 'द केरळ स्टोरी'नंतर 'बस्तर' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Bastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; 'द केरळ स्टोरी'नंतर 'बस्तर' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 26, 2023 04:52 PM IST

The Kerala Story: द केरळ स्टोरी चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह यांनी बस्तर या चित्रपटाची घोषणा केली आहे. आता या चित्रपटाच्या माध्यमातून एक असे सत्य समोर येणार जे पाहून तुम्हीला धक्का बसेल.

Bastar
Bastar

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते आणि चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली. सुरुवातीला या चित्रपटावर सडकून टीका झाली मात्र नंतर हा चित्रपट सर्वत्र सुपरहिट ठरत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता निर्मात्यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विपुल शाह यांनी सोशल मीडियावर आगामी चित्रपट 'बस्तर'चे पोस्टर शेअर करत घोषणा केली आहे. 'द केरळ स्टोरी चित्रपटांच्या निर्मात्यांकडून... एका सत्य घटनेचे साक्षीदार होण्यासाठी तयार व्हा. तुमच्या कॅलेंडरवर ५ एप्रिल २०२४ ही तारीख मार्क करुन ठेवा' या आशयाचे ट्वीट विपुल शाह यांनी केले आहे. सध्या सोशल मीडियावर बस्तर या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

बस्तर हा छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्हात सर्वाधिक लोकसंख्या ही आदिवासी जमातीची आहे. बस्तरमधील आदिवासी हे घनदाड जंगलात राहतात आणि त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बाहेरील लोकांना भेटणे टाळतात. याच लोकांवर आधारित बस्तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विपुल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. आता विपुल शाह यांच्या 'बस्तर' या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग