६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथ जन्मलेल्या विनोद खन्ना यांची ओळख करून द्यायची काहीच गरज नाही. आपल्या कारकिर्दीत एकाहून एक सरस आणि उत्तम असे चित्रपट देणाऱ्या विनोद खन्नासाठी भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा आहे. तब्बल १५० चित्रपटात काम करणारे विनोद खन्ना यांनी त्यावेळी बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅन म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड भूमिका साकारल्या होत्या. हेरा फेरी, अमर अकबर अॅंथनी, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटात तर विनोद खन्ना यांनी बच्चनलासुद्धा खाऊन टाकलं होतं.
१९६८ मध्ये ‘मेरे अपने’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी करिअर यशाच्या शिखरावर असताना आध्यात्मिक गुरु ‘ओशो रजनीश’ यांच्या सेवेसाठी बॉलिवूडमधून ५ वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. बॉलिवूडमध्ये परतू इच्छिणाऱ्या विनोद खन्ना यांना दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ‘जुर्म’ आणि ‘प्रेम धर्म’ या चित्रपटांसाठी साइन केलं होतं. यापैकी ‘प्रेम धर्म’ चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना कास्ट करण्यात आलं होतं. मोठ्या ब्रेकवरून परत आल्यानंतर विनोद खन्ना यांच्या हातात बरेच प्रोजेक्ट होते.
वाचा: आता वीकेएंड होणार हसरा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा!’ विषयी मोठी बातमी, वाचा नेमकं काय
एक दिवस महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांच्याबरोबर रात्रीच्या शिफ्टमध्ये ‘प्रेम धर्म’चं शूटिंग करायचं ठरवलं. हा एक इंटिमेट सीन होता. ज्यात विनोद खन्ना यांना झोपायला जाण्याआधी डिंपल कपाडिया यांना किस करून मिठीत घ्यायचं होतं.
समोर आलेल्या माहितीनुसार, विनोद खन्ना सेटवर पोहोचले. कपडे बदलून डिंपल यांच्यासोबत बेडवर झोपले. शुटिंग सुरु झाले. महेश भट्टने अॅक्शन असे म्हणताच या सीनचे शुटिंग सुरु झाले. विनोद खन्ना यांनी डिंपल यांना अनेकदा किस केलं आणि त्यांना मिठीत घेतलं. पण हा सीन हवा तसा शूट झाला नाही. शेवटी हा सीन पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आला. यावेळी महेश भट्ट आणि टीम थोडी लांब उभी होती. ते डिंपल यांना किस करु लागले आणि मिठीत घेऊ लागले. सीन योग्य पद्धतीने शूट झाला. महेश भट्ट कट म्हणाले. मात्र विनोद यांच्यापर्यंत आवाज न पोहोचल्याने ते डिंपलला किस करत राहिले. त्यांच्या या कृतीने डिंपलही हैराण झाल्या होत्या.