मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Salman Khan: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 09, 2024 01:34 PM IST

Salman Khan eating habit : अभिनेता विंदू दारा सिंह यानं सलमान खानबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. नेमकं काय म्हणाला होता विंदू दारासिंह? जाणून घेऊया.

Salman Khan and Vindu Dara Singh
Salman Khan and Vindu Dara Singh

Vindu Dara Singh on Salman Khan: बॉलिवूड मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. वयाची ५०शी ओलांडूनही सलमान अविवाहित आहे. सलमान हा कायमच खासगी आयुष्यासोबत व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकत्याच एका प्रसिद्ध अभिनेत्याने सलमान विषयी केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सलमानच्या उदारतेबद्दल इंडस्ट्रीत अनेकजण बोलत असतात. आता सलमानचा कॉलेजच्या दिवसांपासून जवळचा मित्र असलेल्या विंदू दारा सिंगने अभिनेत्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. विंदू यांनी नुकताच सिद्धार्थ कन्नलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सलमान खान विषयी वक्तव्य केले. “सलमान सांगायचा की माझी शरीरयष्टी पाहून त्याने जास्त व्यायाम करायला सुरुवात केली आणि मी त्याला नेहमी म्हणायचो की तो खूपच जास्त व्यायाम करतोय. इतकच नाही तर तो जेवतोही जास्तच. तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा व्यायाम करतो,” असे विंदू यांनी म्हटले आहे.

“तो जेवढं खातो, ते पाहून जर आपण विचारले, ‘भाई, हे सगळे जेवण कुठे जाते?’ तो नेहमी उत्तर देतो की तो जाळून टाकतो आणि खरंच संध्याकाळच्या व्यायामादरम्यान तो तेच करतो,” असे विंदू म्हणाला. “सलमान एक अद्भुत आत्मा असलेली व्यक्ती आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, तो खूप मदत करणारा माणूस आहे,” असे विंदूने नमूद केले आहे.

आजही सलमानला वडील पैसे देतात

सलमान खान आजही वडिलांनी दिलेल्या पैशांचा वापर करतो. त्याच्याकडे कधीच रोख रक्कम नसते. त्याच्याकडे वडिलांनी खिश्यात ठेवायला दिलेलेच पैसे असतात. “सलमानचे वडील सलीम खान त्याला रोज पैसे द्यायचे. हे पैसे ते सलमानचा मदतनीस नदीमला द्यायचे. पण शेवटी सलमानचा काय खर्च आहे? त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जे काही दिले मग ते ५० हजार असो, एक लाख असो ते सर्व पैसे तो गरिबांना दान करायचा. आणि त्याने केलेल्या या मदतीचे आशीर्वाद आजही त्याच्याबरोबर आहेत. तो आताही दर महिन्याला किमान २५-३० लाख रुपयांची देणगी देतो” असे विंदू म्हणाले.

WhatsApp channel