विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती एक्स्प्रेस' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट गोध्रा हत्याकांडावर आधारित आहे. सध्या विक्रांत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये विक्रांतने आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितले आहे. एक काळ असा होता की विक्रांतला फाटलेले कपडे घालावे लागत होते. तसेच त्याच्या भावाने देखील अनेक गोष्टी मनाविरुद्ध केल्याचे सांगितले.
प्रमोशनल इंटरव्ह्यूदरम्यान विक्रांत त्याच्या आयुष्याबद्दल आणि त्यात झालेल्या बदलांबद्दल मोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला. एका मुलाखतीदरम्यान विक्रांतने सांगितले की, फाटलेले शूज आणि इतरांचे कपडे घालून तो कंटाळला होता. पैसा आला की लोकांची वागणूक बदलली. त्याला आपला भाऊ मोईनसारखा आपल्या इच्छांचा खून करायचा नव्हता.
विक्रांतने नुकताच बरखा दत्तला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये विक्रांत म्हणाला, 'माझ्या वडिलांना चार जणांचे कुटुंब चालवणे अवघड जात होते. या कुटुंबात मी सुद्धा होतो. माझ्यापुढे स्वत:ची अवाहाने होती. पैसा, यश सगळं होतं पण अचानक सगळं नाहीसं झालं. लांबलचक कथा आहे, थोडक्यात सांगायचं तर कौटुंबिक भांडण होतं. ही १९७० च्या दशकातील एक क्लासिक कथा होती, एक संयुक्त कौटुंबिक कलह. त्याला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पण त्याच्या क्षमतेनुसार त्याने शक्य ते सर्व केले.
विक्रांतने सांगितले त्याला गरिबीचे जीवन जगायचे नव्हते. फाटलेले कपडे आणि शूज घालून मी थकलो होतो. कपड्यांची एवढी मोठी समस्या नव्हती. पण जेव्हा तुम्हाला इतरांचे कपडे घालावे लागतात, तेव्हा खूप भीती वाटते. कितीही स्वच्छ केलं तरी दुसऱ्याला दुर्गंधी येतच राहते. विक्रांत म्हणाला की, अनेकदा त्याच्याकडे शूज विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. विक्रांत म्हणाला की, जेव्हा पैसे आले तेव्हा लोकांचे वागणेही बदलले. तो म्हणाला, 'लोक मला वेगळ्या पद्धतीने गुड मॉर्निंग म्हणू लागले. मोठी गाडी आल्यावर त्यांनी मनापासून हात मिळवायला सुरुवात केली. मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे तडजोड करायची नव्हती. त्याचे मन मोठे आहे पण त्याने तडजोड केली. त्याला खूप काही करायचं होतं पण जमलं नाही. तो स्थिरावला, त्याने त्याग केला, तडजोड केली आणि मी हे शब्द अतिशय विचारपूर्वक सांगत आहे. मला तसं करायचं नव्हतं.
विक्रांतचा भाऊ मोईनने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे की, त्याचा भाऊ एकत्र दिवाळी साजरी करतो आणि लक्ष्मीजीची पूजा करतो. ईदला भावाच्या घरी बिर्याणी खायला त्याचे कुटुंबीय जातात.