Vikrant Massey: भावाने इस्लाम स्वीकारला, वडील ख्रिश्चन तर आई शीख! विक्रांत मेस्सीने केला मोठा खुलासा-vikrant massey talk about religion and his personal life reveal that his brother converted to muslim ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikrant Massey: भावाने इस्लाम स्वीकारला, वडील ख्रिश्चन तर आई शीख! विक्रांत मेस्सीने केला मोठा खुलासा

Vikrant Massey: भावाने इस्लाम स्वीकारला, वडील ख्रिश्चन तर आई शीख! विक्रांत मेस्सीने केला मोठा खुलासा

Feb 22, 2024 02:23 PM IST

Vikrant Massey Talk About Religion: विक्रांत एका मुलाखतीत नुकताच खुलासा केला की, त्याच्या भावाने वयाच्या १७व्या वर्षी मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

Vikrant Massey
Vikrant Massey

Vikrant Massey Talk About Religion: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या '१२वी फेल' चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहे. दुसरीकडे त्याचा हाच आनंद आता आणखी दुणावला आहे. अभिनेता नुकताच बाबा बनला आहे. दरम्यान, अभिनेता पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलला. धर्माबाबतही त्याने मोठं विधान केलं आहे. विक्रांत एका मुलाखतीत नुकताच खुलासा केला की, त्याच्या भावाने वयाच्या १७व्या वर्षी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. भावाच्या धर्मांतराबद्दल कळल्यावर घरातील सदस्यांची काय प्रतिक्रिया होती? हे देखील अभिनेत्याने यावेळी सांगितले.

अभिनेता विक्रांत मेस्सी नुकताच पिता झाला आहे. ७ फेब्रुवारी रोजी त्याची पत्नी शीतल ठाकूर हिने मुलाला जन्म दिला. याच दरम्यान अभिनेत्याने माध्यमांना एक दिलखुलास मुलाखत दिली. नेहमीच आपले आयुष्य खाजगी ठेवणाऱ्या विक्रांत मेस्सी याने पहिल्यांदाच आपल्या कुटुंबाविषयी अनेक रहस्ये उघड केली आहेत. खरं तर, विक्रांत मेस्सी नेहमीच त्याचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवतो. परंतु, यावेळी तो धर्माबद्दल देखील भरभरून बोलला.

माझ्या घरात वेगवेगळ्या धर्माचे लोक!

एका मुलाखतीदरम्यान विक्रांतने म्हटले की, तो ज्या कुटुंबाचा आहे त्यात वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या धर्माचे पालन करते. आपल्या मोठ्या भावाचे नाव मोईन असल्याचेही अभिनेता विक्रांत मेस्सी याने सांगितले. वयाच्या १७व्या वर्षी विक्रांतच्या भावाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तर, त्याच्या या निर्णयामध्ये सगळ्या कुटुंबीयांनीही भावाची साथ दिली होती, असे विक्रांतने म्हटले.

Divya Khosla-Bhushan Kumar: दिव्या खोसला कुमार पतीपासून वेगळी होणार? नेमकं सत्य काय? वाचा...

विक्रांत मेस्सी याने आपल्या कुटुंबातील सदस्यांविषयी बोलताना सांगितले की, त्याचे वडील ख्रिश्चन आणि आई शीख आहे. अभिनेता म्हणाला की, 'लहानपणापासून मी माझ्या घरात धर्म आणि अध्यात्माबाबत बरेच वादविवाद पाहिले आहेत. मोठा भाऊ मुस्लिम झाल्यावर अनेक नातेवाईकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण, त्यावेळी माझ्या वडिलांनी ठामपणे सांगितले की, तो माझा मुलगा आहे आणि त्याने फक्त मलाच उत्तरे दिली पाहिजेत.’

विक्रांत मेस्सीकडे चित्रपटांची रांग

अभिनेता विक्रांत मेस्सी अखेर '12th Fail’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्याला बॉलिवूडमधून खूप वाहवा मिळत आहे. विक्रांत मेस्सी यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही येत आहेत. त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट सामील आहेत. विक्रांत मेस्सी लवकरच एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटातही झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Whats_app_banner
विभाग