विक्रांत मेस्सीचा चित्रपट विक्रम रचणार! एक-दोन नव्हे तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘12th Fail’
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विक्रांत मेस्सीचा चित्रपट विक्रम रचणार! एक-दोन नव्हे तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘12th Fail’

विक्रांत मेस्सीचा चित्रपट विक्रम रचणार! एक-दोन नव्हे तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘12th Fail’

Apr 18, 2024 01:01 PM IST

‘12th Fail’ हा चित्रपट एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट एक-दोन नव्हे तर तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

विक्रांत मेस्सीचा चित्रपट विक्रम रचणार! एक-दोन नव्हे तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘12th Fail’
विक्रांत मेस्सीचा चित्रपट विक्रम रचणार! एक-दोन नव्हे तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार ‘12th Fail’

गेलं वर्ष म्हणजेच २०२३ हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी विशेष खास ठरलं आहे. या वर्षात रिलीज झालेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. या वर्षात रिलीज झालेल्या अनेक चित्रपटांना मोठे यश मिळाले. अभिनेता विक्रांत मेस्सी याचा ‘12th Fail’ हा चित्रपट देखील गेल्या वर्षीच रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. या चित्रपटाने विक्रांत मेस्सी याला खास ओळख मिळवून दिली आहे. आता हा चित्रपट एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा हा चित्रपट एक-दोन नव्हे तर तब्बल २० हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

अभिनेत्री विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री मेधा शंकर स्टारर '12th Fail' सतत नवीन उंची गाठताना दिसत आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाने आधी थिएटरमध्ये आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकांची मने जिंकली. आणि आता हा चित्रपट परदेशातही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘या’ कामासाठी जुई गडकरी अभिनयविश्व सोडायलाही तयार! ‘सायली’ला नक्की करायचंय तरी काय?

चीनमध्ये रिलीज होणार चित्रपट

'12th Fail’ या चित्रपटामध्ये विक्रांत मेस्सीने आयपीएस ऑफिसर मनोज शर्मा यांची भूमिका साकारली होती, जे गरिबीतून बाहेर पडून आयपीएस ऑफिसर झाले होते. हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण, कंगना रणौत यांसारख्या कलाकारांकडून खूप प्रशंसा मिळाली. आता विक्रांत मेस्सी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असल्याचा खुलासा केला आहे.

कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

चीनमध्ये हिंदी चित्रपटांना मागणी

मात्र, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विक्रांत मेस्सी सहकलाकार मेधा शंकरसोबत चीनला जाणार की, नाही हे सांगणे घाईचे असल्याचे विक्रांत म्हणाला. विक्रांत मेस्सी म्हणाला की, ‘याबद्दल बोलणे खूप घाईचे होईल. परंतु, मी खूप उत्साहित आहे, कारण असे काहीतरी खूप दिवसांनी घडले आहे.’ याआधी अभिनेता आमीर खान हा २०१६मध्ये ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनला गेला होता. २००९मध्ये आलेल्या '३ इडियट्स' या चित्रपटाने चीनमध्येही चांगली कामगिरी केली होती.

विक्रांत मेस्सी म्हणाला की, ‘काही महिन्यांपासून या रिलीजवर काम सुरू होते, पण अखेर ही बातमी बाहेर आली आणि सर्वांना माहित आहे की, हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. चीनमध्ये हिंदी सिनेमा किंवा भारतीय सिनेमांना प्रचंड मागणी आहे. '12th Fail'ला देखील २० हजारांहून अधिक स्क्रीन देण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner