Vikrant Massey Become Father : १२ वी फेल या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचणारा अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि विक्रांतचे आयुष्य रातोरात बदलले. विधू विनोद चोप्रा निर्मित या चित्रपटासाठी विक्रांतला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. सध्या विक्रांत एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती दिली आहे.
विक्रांत आणि त्याची पत्नी शितल ठाकूर यांनी इंस्टावर पोस्ट शेयर करत गोड बातमी दिली आहे. हे दोघे सेलिब्रिटी आई बाबा झाले असून त्यांच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोबतच अनेक कलाकारांनी देखील कमेंट करत दोघांचे कौतुक केले आहे.
वाचा: ठरलं! 'हे' कलाकार दिसणार 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये
विक्रांतला १२वी फेल चित्रपटामुळे व्यावसायिक जीवनात मिळालेले यश आणि खासगी आयुष्यात मिळालेली आनंदाची बातमी ऐकून चाहत्यांचा आनंद द्वीगुणी झाला आहे. काल विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण बाबा झाल्याची पोस्ट शेयर केली. त्याला मुलगा झाला असून त्याने आपला हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबतही साजरा केला आहे.
विक्रांतेन इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, 'आमच्या मुलाचे आगमन झाले आहे हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याला शितल आणि विक्रांतकडून खूप सारे प्रेम' असे म्हटले आहे.
यापूर्वी विक्रांतने २४ सप्टेंबर २०२३ मधील एक फोटो शेयर केला असून त्यात त्याने शितलच्या प्रेग्नंसीविषयी चाहत्यांना सांगितले होते. शितल आणि त्याच्या लवस्टोरीबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले. विक्रांतच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तो विधू विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेलमध्ये दिसला होता. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यानंतर तो आता फिर आयी हसीन दिलरुबा आणि सेक्टर ३६ मध्ये दिसणार आहे.