मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikram Gokhale : विक्रम गोखले यांची प्रकृती चितांजनक; अफवांवर विश्वास ठेवू नका! डॉक्टरांचं आवाहन
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

Vikram Gokhale : विक्रम गोखले यांची प्रकृती चितांजनक; अफवांवर विश्वास ठेवू नका! डॉक्टरांचं आवाहन

24 November 2022, 13:17 ISTNinad Vijayrao Deshmukh

Vikram Gokhale Health Update: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुगालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवांना उत आले होते. यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी तसेच दीनानाथ रुगाणल्याचे प्रसिद्धी प्रमुख शिरीष याडगिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी (दि २३) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. उपचारांना ते प्रतिसाद देत नसल्याने अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवल्या होत्या. यामुळे आज त्यांचे नातेवाईक राजेश दामले यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृती बद्दल माहिती दिली. ते म्हणाले, गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना लाईफ सपोर्ट यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत नसले तरी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. या सोबतच अफवांवर विश्वास ठेऊ नका तसेच पसरवणाऱ्यांना थांबवा असे देखील ते म्हाणाले. या सोबत दीनानाथ रुगालयाचे प्रसिद्धी प्रमुख शिरीष याडगिकर यांनी देखील गोखले यांच्यावर उपचार सुरू असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगितले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

मंगेशकर रुगाणल्याचे प्रसिद्धी प्रमुख शिरीष याडगिकर म्हणाले, गोखले कुटुंबाची आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर यांची एक बैठक पार पडली.  अभिनेते विक्रम गोखले हे आयसीयूमध्ये आहेत. ते व्हेंटिलेटर वर आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृती मध्ये सुधार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.  उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या प्रकृती बद्दल माहिती देणारे पुढचे बुलेटिन होईल. 

 नातेवाईक राजेश दामले म्हणाले की, अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कालपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे  कॉम्पिकेशन्स वाढले आहेत. पण डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल जसे पुढचे अपडेट्स येतील तसे सर्वांना कळवले जाईल. त्यांची प्रकृती ही क्रिटीकल आहे, असे देखील राजेश दामले यांनी सांगितले.

त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक जण अफवा पसरवल्या जात आहेत. समाज मध्यमांवर काहीही बोलले जात आहे. असे काहीही झालेले नसून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर काही सांगतील नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबबा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

दरम्यान, गोखले यांची मुलगी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा असे सांगितले होते. गोखले यांच्यावर ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला होता. मात्र, बुधवारी पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित आजार आहेत.

 

विभाग