Vikram Gokhale Birthday: राज ठाकरे ते मराठी मालिका; विक्रम गोखले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सगळेच झाले होते हैराण!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikram Gokhale Birthday: राज ठाकरे ते मराठी मालिका; विक्रम गोखले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सगळेच झाले होते हैराण!

Vikram Gokhale Birthday: राज ठाकरे ते मराठी मालिका; विक्रम गोखले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सगळेच झाले होते हैराण!

Published Oct 30, 2023 07:54 AM IST

Vikram Gokhale Birth Anniversary: स्वतः विक्रम गोखले यांनी मराठी मालिका पाहणे बंद करा असं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं, तेव्हा ते चांगलेच वादात अडकले होते.

Vikram Gokhale
Vikram Gokhale

Vikram Gokhale Birth Anniversary: आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठी मनोरंजन विश्वच नव्हे, तर हिंदीतही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे विक्रम गोखले. 'नटसम्राट' असो वा 'बॅरिस्टर' विक्रम गोखले यांनी प्रत्येक भूमिकेत अक्षरशः जीव ओतला होता. अभिनय कारकिर्दीमुळे विक्रम गोखले जितके लक्षात राहिले, तितकेच ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत राहिले. नेहमीच बिनधास्त आणि बेधडक बोलणारे विक्रम गोखले स्पष्टवक्त अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी कधी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांवर टीका केली. तर, कधी काही व्यक्तींच्या चुकीच्या गोष्टींना आपलं समर्थन देखील दिलं. यामुळे ते नेहमीच चर्च राहिले होते. स्वतः विक्रम गोखले यांनी मराठी मालिका पाहणे बंद करा असं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं, तेव्हा ते चांगलेच वादात अडकले होते.

विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता. त्यांच्या पणजी, आजी आणि वडील यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे अभिनय हा गन त्यांच्यात जन्मजातच होता. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. अभिनयाचं कोणतही शिक्षण नसताना देखील त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यांचे फिल्मी जीवन जितके प्रसिद्धी झोतात होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असायचे. याला कारणीभूत ठरायची ती त्यांची वादग्रस्त वक्तव्य...

Bigg Boss 17: स्पर्धकांना झोपेच्या गोळ्या दिल्या जातात? वादग्रस्त ट्वीट व्हायरल

काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने 'भारत १९४७ नाही तर, २०१४मध्ये खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला' असे म्हटले होते. २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान झाले, त्यासंदर्भात हे व्यक्तव्य कंगनाने केले होते. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याला पाठिंबा देत विक्रम गोखले देखील हेच म्हणाले होते. तर, आणखी एकदा त्यांनी नोटाबंदी हा घाईघाईने घेतलेला निर्णय होता आणि बुलेट ट्रेन ही आमची प्राथमिक गरज नसल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर, गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांचेही त्यांनी समर्थन केले नाही. राज ठाकरेंचे भाषण ऐकणे म्हणजे केवळ करमणूक आहे, असेही ते म्हणाले होते.

सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारताने किती आतंकवादी मारले, असा प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले होते. या हल्ल्यांचे राजकीय भांडवल करणे त्यांना अजिबात आवडले नव्हते. विक्रम गोखले यांनी ‘वजीर’ या मराठी चित्रपटात काम केले होते, मात्र हा चित्रपट टुकार असल्याचे ते स्वतःच म्हणाले होते. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनय 'अभिनय' नव्हता हे सांगण्याचे धाडसही त्यांनी केलं होतं. तर, मराठी मालिका या अतिशय रटाळवाण्या असतात, त्या बघूच नका, असं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीची चर्चेत राहिले होते.

Whats_app_banner