टीव्ही अभिनेता विकास सेठीचा शनिवारी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकासच्या निधनाने कुटुंबीय आणि इंडस्ट्रीमधील सर्वांनाच धक्का बसला. विकासची पत्नी जान्हवी सेठीला तर मोठा धक्काच बसला. नुकताच विकासची पत्नी जान्हवीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. विकासचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील.
दु:खाचा डोंगर सोसणाऱ्या विकासची पत्नी जान्हवी सेठीने विकासचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील. या व्हिडीओमध्ये विकास हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विकास शाहरुख खान आणि राणी मुखर्जीयांच्या 'चलते-चलते' चित्रपटातील 'लय वीना गाय' हे गाणे गात आहे. विकासने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातला असून त्याच्या हातात माइक आहे. हा व्हिडिओ शेअर करत जान्हवीने 'माय हिरो, प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद' असे कॅप्शन दिले आहे. सोबतच दोन हार्ट इमोजी वापरले आहेत.
यापूर्वी जान्हवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विकासच्या निधनाची माहिती दिली होती. तिने पोस्टमध्ये म्हटले होते की, 'दोघेही नाशिकमध्ये आहेत आणि विकासला एक दिवस आधी उलट्या आणि मळमळ होत होती. विकासने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. यानंतर डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले.' जान्हवी पुढे म्हणाली की, 'यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मी त्याला घ्यायला गेले आणि त्याचा मृत्यू झाला. झोपेतच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.'
वाचा: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले 'हे सत्य झाले...'
नाशिकहून विकासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला. विकास गेल्यानंतर त्याची पत्नी आणि २ मुले एकटे पडले आहेत. विकासने क्यूंकी सास भी कभी बहू थी, ससुराल सिमर का, ये वडा रहा असे अनेक टीव्ही शो केले होते. २००१ मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातही तो दिसला होता. याशिवाय त्याने दिवानापन आणि आयस्मार्ट शंकर या चित्रपटातही काम केले आहे. नच बलिए या शोमध्येही तो त्याची पहिली पत्नी अमितासोबत दिसला होता. यानंतर दोघेही विभक्त झाले. 2018 मध्ये विकासने जान्हवीसोबत दुसरे लग्न केले. 2021 मध्ये विकास पुन्हा जुळ्या मुलांचा पालक बनला.