सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले 'हे सत्य झाले...'-vikas sethi post for sidharth shukla death is now real ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले 'हे सत्य झाले...'

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले 'हे सत्य झाले...'

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 10, 2024 08:36 AM IST

विकास सेठी आणि सिद्धार्थ शुक्ला या दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकासने सिद्धार्थच्या मृत्यूवर असं काही लिहिलं, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

vikas sethi
vikas sethi

टीव्ही अभिनेता विकास सेठीचा शनिवारी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकासच्या निधनाने इंडस्ट्रीमधील सर्वांनाच धक्का बसला. आता विकासच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आली आहे जी पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. खरं तर विकासने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहिली होती. पण त्याने सिद्धार्थसाठी लिहिलेली पोस्ट आता खरी ठरली आहे. सिद्धार्थ आणि विकास यांचा मृत्यू एकाच महिन्यात झाला आहे. त्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत.

काय होती विकास सेठीची पोस्ट?

विकास एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीपासून दूर होता आणि सोशल मीडियावरही फारसा अॅक्टिव्ह नव्हता. तरीही त्याच्या निधनानंतर अनेकजण त्याचे सोशल मीडिया अकाऊंट पाहात आहेत. २ सप्टेंबर २०२१मध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हे जग सोडून गेला होता. त्यावेळी विकासने एक पोस्ट लिहिली होती. 'आयुष्य डोळ्यासमोर झटक्यात बदलते. क्षणार्धात तुम्ही माणसाची आठवण बनता. तुझी आठवण मी कायम जपणार आहे. आरआयपी यार, तू कुठे गेलास, मला रस्ता सांग, मी तिथे येऊन तुला भेटतो' या आशयाची पोस्ट विकासने केली होती.

 

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

विकासने सिद्धार्थसाठी लिहिलेली ही पोस्ट पाहून सर्वजण चकीत झाले. एका यूजरने या पोस्टवर विकासच्या मृत्यूनंतर कमेंट करत म्हटले की, 'आज खरोखरच विकास जसे म्हणाला होता तसेच झाले आहे.' दुसऱ्या एका यूजरने 'आश्चर्याची बाब म्हणजे तो सप्टेंबरमध्ये गेला होता आणि हा देखील' कमेंट करत असे म्हटले. तिसऱ्या एका यूजरने 'कधी कधी वर असलेली व्यक्ती आपले बोलणे ऐकत असते. त्यामुळे जीवन जगा. हे एकच जीवन आपल्याला मिळते. एक दिवस मरायचेच आहे. मग मरण पावणाऱ्यांकडे पत्ता मागू नये. दु:खाचा हा मार्ग योग्य नाही' अशी कमेंट केली आहे. एका यूजरने तर 'आज तीच घटना पुन्हा घडली' असे म्हटले आहे.
वाचा: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

विकास सेठी यांनी नाशिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. या अभिनेत्यावर ९ सप्टेंबर रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. विकासला निरोप देण्यासाठी कुटुंबीयांसह अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारही पोहोचले होते. यावेळी अभिनेत्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एवढ्या कमी वयात आपल्या मुलाला शेवटचा निरोप देताना माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विकासची आई त्याच्या मृतदेहाजवळ उभी राहून खूप रडताना दिसली आहे.

 

Whats_app_banner
विभाग