Vikas Sethi Funeral: लेकाला शेवटचा निरोप देताना आईला अश्रू अनावर; व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी-vikas sethi funeral videothe mother sheds tears while bidding her last farewell to son vikas sethi ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikas Sethi Funeral: लेकाला शेवटचा निरोप देताना आईला अश्रू अनावर; व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी

Vikas Sethi Funeral: लेकाला शेवटचा निरोप देताना आईला अश्रू अनावर; व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी

Sep 09, 2024 06:54 PM IST

Vikas Sethi Funeral Video: विकास सेठी यांनी नाशिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. या अभिनेत्यावर ९ सप्टेंबर रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Vikas Sethi Funeral Video
Vikas Sethi Funeral Video

Vikas Sethi Funeral Video: टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये दमदार काम करणारे अभिनेते विकास सेठी यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. ८ सप्टेंबर रोजी 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. झोपेत असताना विकास सेठी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विकासच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. विशेषत: त्याची पत्नी, दोन मुले आणि आईची अवस्था खूपच वाईट आहे. विकासच्या अंत्यसंस्काराला अनेक सेलेब्स उपस्थित होते. त्याचे मित्र आणि अनेक टीव्ही स्टार्स त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते.

विकास सेठी यांनी नाशिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. या अभिनेत्यावर ९ सप्टेंबर रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. विकासला निरोप देण्यासाठी कुटुंबीयांसह अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारही पोहोचले होते. यावेळी अभिनेत्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एवढ्या कमी वयात आपल्या मुलाला शेवटचा निरोप देताना माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विकासची आई त्याच्या मृतदेहाजवळ उभी राहून खूप रडताना दिसली आहे.

Ankita Lokhande: भक्तीच्या नावाखाली तमाशा! अंकिता लोखंडे-निया शर्माचा गणपती डान्स बघून नेटकरी संतापले!

व्हिडीओ बघताना नेटकरीही रडले!

विकासची आओ सतत आपल्या मुलाच्या मृतदेहाकडे पाहत होती. कोणत्याही आईसाठी हा नक्कीच सर्वात कठीण प्रसंग असू शकतो. विकासच्या घरातील बाकीचे सदस्य त्याच्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न करत असले, तरी शेवटी आई ही आईच असते. आपल्या मुलाला शेवटचं बघताना त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. यावेळी अभिनेत्याची आई बेशुद्ध देखील झाली होती. मात्र, त्याच्या कुटुंबाने आईला आधार देत त्यांना संभाळलं. हा व्हिडीओ बघून आता प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

कमी वयात घेतला जगाचा निरोप

'कसौटी जिंदगी की' सारख्या लोकप्रिय शोमध्ये काम केलेला अभिनेता विकास सेठी अवघ्या ४८ वर्षांचा होता. त्याला दोन लहान जुळी मुले होती. विकास सेठी याने ८ सप्टेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला, त्यानंतर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला. विकाससोबत काम करणारा अभिनेता हितेन तेजवानी त्याला ‘यारों का यार’ म्हणत होता. विकासच्या निधनाने हितेनलाही मोठा धक्का बसला आहे. विकास हा अतिशय मनमिळाऊ व्यक्ती असल्याचे त्याने सांगितले. तो नेहमी आनंदी असायचा. मी त्याच्यासोबत काही शोमध्ये काम केले आहे, त्यामुळे मी त्याला चांगला ओळखत होतो, असेही हितेन म्हणाला.

Whats_app_banner
विभाग