Vijayadashami 2023 Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'तेजस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री कंगना रनौत ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. नुकताच तिच्या 'तेजस' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'तेजस' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आता कंगना तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका खास ठिकाणी जाणार आहे. 'पंगा क्वीन' कंगना आज रावण दहन करणार आहे.
अभिनेत्री कंगना रनौत दसऱ्याच्या निमित्ताने दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर लव कुश रामलीलामध्ये सहभागी होणार असून, रावण दहन करणार आहे. यावेळी ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंगना तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील लवकुश रामलीलामध्ये ती सहभागी होणार आहे.
दरवर्षी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. मात्र, यावर्षी पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. यासाठी लव-कुश रामलीलामध्ये सर्व स्तरातील महिलांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये कंगना रनौतचेही नाव सामील आहे. यानिमित्ताने कंगना तिच्या चित्रपटाचे प्रमोशन देखील करणार आहे. अभिनेत्री कंगनाने ८ ऑक्टोबर म्हणजेच एअर फोर्स डे रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 'तेजस'च्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’ याआधी २० ऑक्टोबरला रिलीज होणार होता. पण, टायगर श्रॉफच्या ‘गणपत’सोबत बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर पाहता, चित्रपट निर्मात्यांनी ‘तेजस’चे प्रदर्शन एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर आता चाहते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत.
संबंधित बातम्या