Vijay Varma Upcoming Movie: आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मची चलती पाहायला मिळते. अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता या चित्रपटांच्या यादीमध्ये 'मर्डर मुबारक' चित्रपटाचा समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. कारण या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
'मर्डर मुबारक' चित्रपटाच्या ट्रेलरवरुन ही एक मसालेदार मर्डर मिस्ट्री असल्याचे जाणवते. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, दमदार संवाद आणि जोडीला दिग्गज कलाकारांची फौज असल्यामुळे चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ट्रेलरमध्ये सारा आणि विजयच्या लिप किस आणि इंटिमेट सीन्सचीही झलक आहे. पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा आपल्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत असून खुन्याचा शोध घेताना दिसत आहे.
वाचा: अनंत अंबानीच्या हातातील घड्याळ पाहून मार्क झुकरबर्गची पत्नी थक्क, जाणून घ्या किंमत
'मर्डर मुबारक'मध्ये पंकज त्रिपाठी एसीपी भवानी सिंगची भूमिका साकारत आहे. चित्रपटात उच्चभ्रू कुटुंब दाखवण्यात आले आहे. एका पार्टीत एक हत्या होते. या हत्या प्रकरणात सात जण संशयित आहेत. सारा अली खान, करिश्मा कपूर, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोप्रा आणि सुहेल नय्यर अशी सात लोक संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
वाचा: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट
'मर्डर मुबारक' या चित्रपटात डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, सारा अली खान, संजय कपूर, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क
'मर्डर मुबारक' हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी स्पेशल असल्यामुळे केवळ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे. चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.