लोकेश कनकराज दिग्दर्शित 'लिओ' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर वर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. आता हा चित्रपट कुठे आणि कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विजय थलपतीचा 'लिओ' हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२३ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबाबत नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. यापूर्वी हा चित्रपट १६ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
वाचा: १२ वर्षांनी झाला हनी सिंगचा घटस्फोट, पत्नी केला होता कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप
लिओ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात २६४ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ५३.३५ कोटी रुपयांची कमाई केली. जवळपास चित्रपटाने ५८४ कोटी रुपयांची कमाई आतापर्यंत केली आहे. लवकरच हा चित्रपट ६०० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याचे म्हटले जात आहे.
लिओ या चित्रपटात विजय थलपतीसोबत संजय दत्त, अनुराग कश्यप, प्रिया आनंद, तृषा कृष्णन, मैस्किन आणि बेबी एंटनी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सेवन स्क्रीन स्टुडिओ आणि द रूट बॅनर आणि एस.एस. ललित कुमार आणि जगदीश पलानीसामी यांच्या बॅनरअंतर्गत 'लियो' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनकराजने केले आहे.
संबंधित बातम्या