बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपती यांचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यापोठापाठ चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विजय आणि कतरिना चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत विजयला राग अनावर झाला आहे.
विजय आणि कतरिनाने तमिळनाडूमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी एका पत्रकाराने विजयला 'तामिळनाडूच्या राजकारणावर त्यांची भूमिका काय आहे. खास करुन जेव्हा हिंदीला विरोध केला जातो' असा प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकून विजय चिडला. त्याने पत्रकराला चांगलेच सुनावले.
वाचा: बाप-लेकाच्या हळव्या नात्याची हटके कथा! कसा आहे नाना पाटेकरांचा ‘ओले आले’? वाचा...
'एक भाषा म्हणून हिंदीचा कधीही विरोध केला गेला नाही' असे तमिळ भाषेत म्हणला. पुढे पत्रकराने त्याला 'जर ती भाषा शिकण्याची वेळ आली तर' असा प्रश्न विचारताच विजयचा पारा चढला. 'मला चांगले आठवते असा प्रश्न तू जेव्हा आमिर खान सर इथे आले होते तेव्हा देखील विचारला होता. बरोबर ना? तू अशा प्रकारचे प्रश्न का विचारतो. अशा प्रकारचे प्रश्न विचारुन तुला काय मिळते. सर्वात आधी तर ते (राजकीय नेते) कधीच हिंदी भाषेचा अभ्यास करु नका असे म्हणत नाहीत. इथे उपस्थित असलेले अनेकजण हिंदी शिकत आहेत. कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही.मंत्री पीटीआर (त्यागराजन) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जाऊन बघ' असे रागाच्या भरात तो म्हणाला.
'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघव करत आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय आणि कतरिनासोबत संजय कपूर, विनय पाठक. टिनू आनंद, प्रतिमा खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या