Vijay Sethupathi Big Decision: 'त्या' भूमिका नको रे बाबा! 'जवान'नंतर विजय सेतुपतीने घेतला मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vijay Sethupathi Big Decision: 'त्या' भूमिका नको रे बाबा! 'जवान'नंतर विजय सेतुपतीने घेतला मोठा निर्णय

Vijay Sethupathi Big Decision: 'त्या' भूमिका नको रे बाबा! 'जवान'नंतर विजय सेतुपतीने घेतला मोठा निर्णय

Published Nov 29, 2023 11:59 AM IST

Vijay Sethupathi Big Decision After Jawan:'जवान' या चित्रपटानंतर विजय सेतुपती याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Vijay Sethupati Big Decision
Vijay Sethupati Big Decision

Vijay Sethupathi Big Decision After Jawan: बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या 'जवान' या चित्रपटात साऊथ स्टार विजय सेतुपती याने साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात विजय सेतुपती याने अतिशय खतरनाक असा खलनायक साकारला होता. मात्र, आता या चित्रपटानंतर विजय सेतुपती याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे चित्रपटांमध्ये खलनायक साकारणार नसल्याचे विजयने म्हटले आहे. यापुढे कोणत्याही चित्रपटात अभिनेत्याच्या विरोधात Vijay Sethupati Big Decisionअसणारे पात्र अर्थात 'अँटी हिरो' भूमिका कधीच साकारणार नसल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. या भूमिकांबद्दल बोलताना विजय सेतुपती म्हणाला की, 'या आधी मी अशा भूमिका केवळ मुख्य अभिनेत्यांच्या विनंतीमुळे साकारल्या होत्या.'

अभिनेता विजय सेतुपती म्हणाला की, 'मला आता व्हिलनच्या भूमिका करायच्या नाही. याच कारण म्हणजे फिल्म मेकर्स आता माझ्यावर इमोशनल प्रेशर टाकू लागले आहेत. खलनायक साकारताना अनेक मर्यादा असतात. अनेकदा तुमच्या टॅलेंटवरही गदा येते. चित्रपटात खलनायक साकारताना खूप काळजी घ्यावी लागते. आपण साकारलेला खलनायक चित्रपटाच्या हिरोपेक्षा मोठा तर दिसणार नाही ना? याची खबरदारी घ्यावी लागते.'

यापुढे बोलताना तो म्हणाला की, 'चित्रपट जेव्हा संपादनासाठी जातो तेव्हा, एडिटरच्या टेबलवर खलनायकाची अनेक दृश्य सरळ कापली जातात.' यामुळे आता खल भूमिका साकारायची नाहीत, असा निर्णय विजय सेतुपती याने घेतला आहे. किमान पुढील काही वर्ष तरी विजय सेतुपती अशा भूमिकांमध्ये दिसणार नाहीये. आतापर्यंत विजय सेतुपती याने अनेक चित्रपटांमध्ये व्हिलन साकारला आहे. त्याच्या खलभूमिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. त्याला खलभूमिकांसाठी पुरस्कार देखील मिळाला आहे.

Whats_app_banner