दाक्षिण सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'लाइगर'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार आहे. गेल्या आठवड्यात या चित्रपटासाठी हैदराबाद येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, त्याने चक्क भर परिषदेत पाय टेबलवर ठेवल आहेत. विजयने असे का केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हैदराबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषेदत एका पत्रकाराने विजयला 'टॅक्सीवालाच्या रिलिज वेळी तुम्ही सर्वांनी मनापासून गप्पा मारल्या नव्हत्या. आता तू गप्पा मारताना दिसत आहेस' असे म्हटले. त्यावर विजयने पाय टेबलवर ठेवले आणि म्हणाला, 'चला आज मनसोक्त गप्पा मारुया.' ते पाहून सर्वांना धक्का बसला. जेव्हा या पत्रकार परिषदेतला व्हिडीओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेटकऱ्यांनी विजयचा हा फोटो शेअर करत त्याच्या लाइगर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. विजय खूप रुड आहे. असे टेबलवर पाय कोण ठेवते? या आशयाचे ट्वीट केले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी 'लाइगर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. आता हा बहुचर्चित चित्रपट २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. प्रेक्षक अनन्या आणि विजयला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.