दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सध्याचा अतिशय लोकप्रिय आणि सुपरस्टार अभिनेता म्हणून विजय देवरकोंडा ओळखला जातो. आज ९ मे रोजी या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. अभिनयाची किंवा चित्रपसृष्टीमध्ये कोणतीही गॉडफादर नसताना देखील विजयने आपल्या अभिनयान प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. आजच्या घडीला तो एक यशस्वी आणि उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, एक काळ असा होता जेव्हा विजयच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याने अभिनय सोडावा यासाठी दबाव टाकला होता.
विजयचा जन्म ७ मे १९८९ साली हैदराबाद येथे झाला. तो आज त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पाय ठेवण्यापूर्वी विजयला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. विजयने २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नुव्विला' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याच्या या पहिल्या चित्रपटात अनेक कलाकार होते. त्यानंतर तो २०१२मध्ये 'लाईफ इज ब्यूटीफुल' चित्रपटात काम करताना दिसला. मात्र, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. या चित्रपटांना विजयला प्रसिद्धी मिळवून देण्यात अपयशी ठरले. या चित्रपटांनंतर जवळपास दोन वर्षे विजय घरातच होता. या काळात एकही प्रोजेक्ट त्याच्या हाती आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्यावर इंडस्ट्री सोडावी म्हणून दबाव आणण्यास सुरुवात केली.
वाचा: गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार
दोन वर्षांचा गॅप हा मोठा असतो असे म्हणत विजयच्या घरातील सदस्यांनी अभिनय सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये तो खूप हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. मात्र, चित्रपट आणि शूटिंगमुळे त्याने कॉलेजला जाणे सोधले होते. कमी हजेरी असल्यामुळे त्याला कॉलेजमध्ये भरपूर दंडही भरवा लागला होता. पण, तरीही विजय मन लावून अभ्यास करायचा आणि परीक्षेतही टॉप करायचा. त्यामुळे त्याने शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे म्हणून कुटुंबीय वारंवार त्याच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत होते. अभ्यासात चांगला असताना त्याला सिनेमात का जायचे आहे? असा सवाल ते सतत करत होते. मात्र, घरच्यांना शांत करण्यासाठी विजय काही ना काही प्रोजेक्ट करत असत.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘येवडे सुब्रमण्यम’ हा विजयचा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाच्या वेळी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला चांगली साथ दिली. नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याचा ‘पेल्ली चोपुलु’ हा चित्रपट देखील हिट ठरला. त्यानंतर त्याने 'अर्जुन रेड्डी' चित्रपट केला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आज विजय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे.
वाचा: गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या
संबंधित बातम्या