Vijay Deverakonda: का होतोय #BoycottLigerMovie ट्रेंड? काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vijay Deverakonda: का होतोय #BoycottLigerMovie ट्रेंड? काय आहे कारण?

Vijay Deverakonda: का होतोय #BoycottLigerMovie ट्रेंड? काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 20, 2022 07:34 PM IST

ट्विटरवर #BoycottLigerMovie ट्रेंड होताना दिसत आहे. पण अशी मागणी का गेली जात आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

<p>विजय देवरकोंडा</p>
<p>विजय देवरकोंडा</p> (HT)

२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी वाईट असल्याचे दिसत आहे. या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी दोन ते तीन मोजून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले. तसेच अनेक चित्रपटांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. आता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर #BoycottLigerMovie ट्रेंड होताना दिसत आहे. पण अशी मागणी का गेली जात आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गेल्या आठवड्यात हैदराबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विजय देवरकोंडाने केलेल्या कृतीमुळे असे झाले आहे. या पत्रकार परिषदेत त्याने एका पत्रकाराला उत्तर देत पाय चक्क टेबलावर ठेवले आहेत. ते पाहून अनेकांनी त्याला सुनावले आहे. त्यासोबतच ट्विटरवर #BoycottLigerMovie ट्रेंड होताना दिसत आहे.

काय झालं होतं नेमकं?

हैदराबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषेदत एका पत्रकाराने विजयला 'टॅक्सीवालाच्या रिलिज वेळी तुम्ही सर्वांनी मनापासून गप्पा मारल्या नव्हत्या. आता तू गप्पा मारताना दिसत आहेस' असे म्हटले. त्यावर विजयने पाय टेबलवर ठेवले आणि म्हणाला, 'चला आज मनसोक्त गप्पा मारुया.' ते पाहून सर्वांना धक्का बसला. जेव्हा या पत्रकार परिषदेतला व्हिडीओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांनी विजयचा हा फोटो शेअर करत त्याच्या लाइगर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. विजय खूप रुड आहे. असे टेबलवर पाय कोण ठेवते? या आशयाचे ट्वीट केले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी 'लाइगर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. आता हा बहुचर्चित चित्रपट २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. प्रेक्षक अनन्या आणि विजयला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Whats_app_banner