Liger: खुशखबर! या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 'लायगर'
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Liger: खुशखबर! या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 'लायगर'

Liger: खुशखबर! या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 'लायगर'

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 19, 2022 03:49 PM IST

Liger on OTT: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यामुळे आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

<p>लायगर</p>
<p>लायगर</p> (HT)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा यांचा लायगर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकलेला नाही. बायकॉट मोहिम आणि निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर चित्रपटाला त्यांचे बजेटसुद्धा कमावता आले नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

लायगर हा पहिल्यांदा साउथमध्ये रिलिज झाला होता. त्यानंतर २६ ऑगस्टला हिंदीत प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्याआधी २५ ऑगस्टला हिदी व्हर्जनचे पेड प्रीव्ह्यू शोसुद्धा ठेवण्यात आले होते. यातून चित्रपटाने सव्वा कोटी रुपये कमावले होते. पण चित्रपटाने जवळपास ४० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या चित्रपटाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मला विकण्यात आले आहेत.
वाचा: आर्यन खानच्या अडचणी पुन्हा वाढणार? NCB च्या अहवालातून धक्कादायक खुलासा

लायगर हा चित्रपट ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी लायगरचे हिंदी व्हर्जन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

लायगर चित्रपटात विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला आहे.

Whats_app_banner