मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्...

विजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्...

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 01, 2024 06:47 PM IST

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडाने त्याला मिळालेला पहिला फिल्मफेअर पुरस्कार का विकला? हे जाणून घेऊया...

विजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्...
विजय देवरकोंडाने २५ लाखाला विकला पहिला फिल्मफेअर पुरस्कार अन्...

सध्याच्या घडीला चाहत्यांमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार कलाकारांची क्रेझ पाहायला मिळते. त्यामध्ये अभिनेता विजय देवकरकोंडा हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हिट होताना दिसत आहे. सध्या विजय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यादरम्यान, विजयने एका मुलाखतीमध्ये पहिला फिल्मफेअर पुरस्कार विकल्याचा खुलासा केला आहे.

विजयने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने करिअरच्या सुरुवातील सगळ्यात पहिला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्काराचा लिलाव केल्याची माहिती दिली. पण त्यातून मिळालेल्या पैशांचे त्याने काय केले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जेव्हा चाहत्यांना विजयच्या या कृतीविषयी कळाले तेव्हा त्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले. चला जाणून घेऊया विजयने नेमके काय केले?
वाचा: मलायका आणि शुरा पहिल्यांदाच आमनेसामने, अरबाज खानचा व्हिडीओ व्हायरल

विजयने नुकताच गाला चॅरिटा कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. “मला प्रमाणपत्रे आणि पुरस्कारांच्या ट्रॉफीमध्ये फारसा रस नाही. मी कधीही ते जपून ठेवत नाही. माझे काही पुरस्कार हे ऑफिसमध्ये असतील तर काही माझ्या आईने कुठेतरी उचलून ठेवले असतील. मी काही पुरस्कार तर इतरांना दिले. त्यातला एक पुरस्कार मी संदीप रेड्डी वांगा यांना देखीस दिला होता” असे विजय म्हणाला.
वाचा: AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण

पुढे तो म्हणाला, “मला करिअरच्या सुरुवातीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्म फेअर देण्यात आला होता. पहिल्या पुरस्काराचा मी लिलाव केला होता. त्याच्यातून मला चांगले पैसे मिळाले. मला वाटते दगडाचा तुकडा घरात ठेवण्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे.” विजयने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे पैसे दान केले. या सगळ्या गोष्टी  विजयने नुकतीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या. यामध्ये त्याने लग्न करून बाबा व्हायचं आहे, असं म्हटलं होतं. विजय रश्मिका मंदानाला डेट करत असल्याची चर्चा आहे, पण दोघांनीही याबाबत कधीच अधिकृत माहिती दिलेली नाही.

IPL_Entry_Point