Vidyut Jammwal Arrested: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाला सध्या त्याचा आगामी चित्रपट 'क्रॅक'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे तो जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, विद्युत अडचणीत सापडला आहे. अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. असे काय झाले की विद्युतला पोलिसांनी अटक केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या वांद्रे कार्यालयातून विद्युत जामवालाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अभिनेता पोलीस ठाण्यात खूर्चीवर बसल्याचे दिसत आहे. हे वांद्रे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील आरपीएफ कार्यालय आहे. आरपीएफ अधिकाऱ्यांनी विद्युतला धोकादायक स्टंट केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. मात्र, याबाबत कोणीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वाचा: रविंद्र महाजनींना होती जुगाराची सवय, मुलगा गश्मीरने सांगितले कटू सत्य
विद्युत हा बॉलिवूडमधील अॅक्शन अभिनेता म्हणून विशेष ओळखला जातो. त्याचे स्टंट हे तरुणांच्या मनात घरुन आहेत. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते. पण याच स्टंटबाजीमुळे विद्युत अडचणीत सापडला आहे.
विद्युत जामवाल फक्त अभिनेता नाही तर, मार्शल आर्टिस्ट देखील आहे. ‘कमांडो’ सिनेमानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेत्याला या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील देण्यात आला आहे.
विद्युतने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट 'शक्थी'हा तेलुगू होता. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा 'फोर्स' हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. त्यानंतर विद्युतने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने ‘कमांडो’,‘अनजान’, ‘बादशाहो’, ‘कमांडो 2’, ‘जंगली’ ‘यारा’, ‘कमांडो 3’ आणि ‘सनक’ या चित्रपटांमध्ये काम केले. आता 'क्रॅक' हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
विद्युत हा त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. तो भिनेत्री करिश्मा कपूर हिची सवत आणि उद्योजक संजय कपूर याची पहिली पत्नी नंदिता महतानीला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर दोघांचेही फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या