बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही सतत चर्चेत असते. ती काही मोजक्याच चित्रपटात काम करते. मात्र तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडताना दिसतात. लवकरच विद्याचा 'नीयत' हा भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टवरुन चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रतीक्षा होती त्या 'नीयत' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. या थरारपटामध्ये अभिनेत्री विद्या बालन ही प्रमुख भूमिकेत असून तिचे चाहते या चित्रपटाची बरेच दिवस वाट पाहात आहेत. हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. २०२० साली प्रदर्शित झालेल्या शकुंतला देवी चित्रपटाचे दिग्दर्शन अनू मेनन यांनी केले होते. शकुंतला देवी चित्रपटातही विद्या बालन प्रमुख भूमिकेत होती. ही जोडी नीयत चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे.
वाचा: घाडगे वकिलांच्या धमक्यांमुळे आयेशाला आठवणार का भूतकाळ? मालिकेत येणार नवा ट्विस्ट
अनू मेनन दिग्दर्शित 'नीयत' या चित्रपटात विद्या बालनसोबत कलाकारांची फौज दिसणार आहे. त्यामध्ये राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, निकी वालिया, दीपानिता शर्मा, शशांक अरोरा, प्राजक्ता कोळी, दानेश रझवी, इशिका मेहरा आणि माधव देवल हे कलाकार दिसणार आहे.
विद्या बालनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती २०२० साली प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या शकुंतला देवी चित्रपटात दिसली होती. २०२१मध्ये तिने शेरनी आणि २०२२मध्ये ती जलसामध्ये दिसली होती. आता तिचा 'नीयती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या