'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या करिअरमध्ये गेम चेंजर ठरला. सिल्क स्मिता यांच्या जीवनावर बनलेल्या या बायोग्राफिकल ड्रामामध्ये ती रेश्माची भूमिका साकारताना दिसली होती आणि प्रेक्षकांनी पहिल्यांदाच तिला मोठ्या पडद्यावर बोल्ड अवतारात पाहिले होते. मिलन लुथरियाने जेव्हा विद्या बालन हा चित्रपट ऑफर केला तेव्हा तिने आपले सर्वोत्कृष्ट योगदान दिले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर विद्याने प्रतिक्रिया दिली आहे.
विद्या लवकरच 'भूल भुलैया 3' चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये विद्या बालनला तिच्या सुपरहिट 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
विद्या बालनने गलेटा इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला 'द डर्टी पिक्चर'चा भाग-२ करण्यासाठी ती किती उत्सुक आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विद्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिला नेहमीच डर्टी पिक्चर करायचा होता. अशा भूमिकेबद्दल तिला सावध करणाऱ्या आजूबाजूच्या लोकांची मतं काहीही असली तरी अशा चित्रपटाबद्दल तिला अजूनही खात्री होती. विद्या बालन म्हणाली की, ती एक भुकेली अभिनेत्री आहे आणि जेव्हा दिग्दर्शक मिलन लुथरिया माझ्याकडे आले आणि मला सिनेमा ऑफर केला तेव्हा तिने लगेच या चित्रपटासाठी होकार दिला.
भूल भुलैया 3 फेम अभिनेत्री म्हणाली की, तिच्या लक्षात आले आहे की तिला यापूर्वी कधीही अशी भूमिका ऑफर केली गेली नव्हती आणि तिचा हा निर्णय कारकिर्दीतील सर्वोत्तम मानला. या भूमिकेला होकार दिल्यानंतर अनेकांनी विद्याला प्रतिमेला धक्का बसेल असे म्हटले होते. अनेकांनी तिला सांगितले की, तिची इमेज खूप वेगळी आहे. त्यावर विद्याने त्याच लोकांना विचारले की, कोणत्या प्रकारची इमेज? मी नुकतीच माझी कारकीर्द सुरू केली आहे.
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू
'द डर्टी पिक्चर'च्या भाग २ बद्दल विद्या बालनला विचारले असता ती म्हणाली, 'मला हे करायला नक्कीच आवडेल. मी तयार आहे. मी पूर्णपणे तयार आहे आणि मला वाटते की होय, हे अप्रतिम असेल. तुम्ही समजून घ्या, बराच काळ झाला की मी कुठलीही रसाळ भूमिका केली नाही. विद्या म्हणाली की, ती लोकांच्या गोष्टींचा फारसा विचार करत नाही आणि तिला नेहमीच पडद्यावर सर्व प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा होती. या चित्रपटात रेश्माची भूमिका साकारण्यास ती घाबरत नसल्याचे तिने सांगितले. खरं तर ती बऱ्याच दिवसांपासून अशा संधीची वाट पाहत होती.