आपल्या अभिनय कौशल्याने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. मग ती भूमिका बोल्ड असून दे नाही तर बिनधास्त. विद्या ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. सध्या सोशल मीडियावर विद्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती Oops Momentची शिकार झाल्याचे समोर आले आहे.
नुकताच विद्या बालनने प्री-वेडिंग पार्टीला हजेरी लावली. त्यावेळी तिच्यासोबत तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर देखील हजर होता. दरम्यान, विद्याने लाल रंगाची फ्लोरल प्रिंट असलेली साडी नेसली होती. तर सिद्धार्थने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. विद्या या पार्टीला एण्ट्री करत असताना तिचा पती एका व्यक्तशी बोलताना दिसतो. त्या व्यक्तीच्या हातात विद्याच्या साडीचा पदर अडकला असल्याचे दिसत आहे. पण विद्या ते योग्य पद्धतीने सांभाळते. सध्या सोशल मीडियावर विद्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वाचा: मीराने दीर ईशानच्या लगावली कानशिलात, शाहिद कपूरने पाहिलं अन्...
विद्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत, 'विद्या बालनच्या पतीने जाऊन त्या टकल्याच्या कानाखाली मारायला हवी होती' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने, 'हा असा कसा पती आहे? त्याने हे प्रकरण सांभाळलं देखील नाही' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका व्यक्तीने, 'किती उद्धट व्यक्ती आहे. याच्या दोन कानाखाली वाजवायला हव्यात' अशी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या