बिनधास्तपणे आणि उघडपणे सर्व विषयांवर आपलं मत मांडणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्याचे अभिनय कौशल्य पाहून अनेक कलाकारांना तिच्यासोबत काम करायचे असते. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडचा सीरियल किसर इम्रान हाश्मी विद्यासोबत किसिंग सीन देताना घाबरला होता. यामागे नेमके काय कारण होते? हे विद्याने सांगितले आहे.
विद्याने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने ऑनस्क्रीन किसिंग सीनचा अनुभव देखील सांगितला. अभिनेता आर माधवनला तिने गुरु चित्रपटात किस केले होते. त्याबद्दल फार काही आठवत नाही. कारण पावसात तो सीन शूट होत होता आणि मी व्हीलचेअरवर होते. त्यानंतर इश्कियामध्ये तिने अर्शद वारसीसोबत किसिंग सीन दिला होता. पण इम्रानसोबत अतिशय वेगळा अनुभव आला होता.
वाचा: ८०-९०च्या दशकात माझ्या दोन बायका होत्या; गोविंदाची पोस्ट चर्चेत
घनचक्कर या चित्रपटात विद्या आणि इम्रानने किसिंग सीन दिला होता. या किसिंग सीनविषयी बोलताना विद्या म्हणाली की, 'इम्रान हाश्मी मला सेटवर सीननंतर सतत विचारत होता आपल्या किसिंग सीनविषयी सिद्धार्थला काय वाटेल? मला सीन पुन्हा पाहायला मिळेल का?' या चित्रपटाची निर्मिती विद्याचे पती सिद्धार्य रॉय कपूरने केली होती. त्यामुळे इम्रान थोडा घाबरला होता.
विद्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर यंदा ती एकच चित्रटात दिसली. त्या चित्रपटाचे नाव नियत असे आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यापूर्वी २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या जलसा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
संबंधित बातम्या