Vidya Balan New: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विद्या काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत असली तरी खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे ती अनेकांचे लक्ष वेधून घेते. आता विद्या बालनने पोलिसात धाव घेतली असून तिने तक्रार दाखल गेली आहे. नेमके काय झाले आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
विद्या बालनच्या नावाचा एक फेक इन्स्टा आयडी तयार करण्यात आला आहे. या अकाऊंटवरुन काही लोकांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. याविरोधात विद्या बालनने याविरोधात पोलिसात धाव केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांनी विद्या बालनची तक्रार दाखल करुन घेतली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, विद्या बालनने एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीवर फेक इन्स्टाग्राम अकाऊंट उघडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या अकाऊंटवरुन त्या व्यक्तीने अनेकांकडून पैशांची मागणी केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. 'आरोपीने विद्या बालनच्या नावाचा एक इन्स्टा आयडी तयार केला आहे. ज्याच्या माध्यमातून तो लोकांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत होता. खार पोलिस ठाण्यात या व्यक्तीविरोधात आयटी अॅक्टचे सेक्शन ६६ अच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे' अशी माहिती देण्यात आली आहे.
वाचा: सावधान! 'डॉन' पुन्हा येतोय; अमिताभ, SRKच्या जागी 'या' अभिनेत्याची वर्णी
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्या बालनचे खरे अकाऊंट आणि फेक अकाऊंट दाखवण्यात आले आहे. विद्याचे इन्स्टाग्रामवर ९२ लाख फॉलोअर्स आहेत. तसेच ती १०५ लोकांना देखील फॉलो करते. विद्याने आतापर्यंत ८३८ पोस्ट केल्या आहेत. विद्या खासकरुन सोशल मीडियावर सध्याच्या ट्रेंड किंवा तिच्या चित्रपटाशी संबंधीत व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.
विद्या बालनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटात विद्यासोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच विद्या कार्तिक आर्यन आणि कियारी आडवाणीसोबत 'भुलैया ३'मध्ये देखील दिसणार आहे.
संबंधित बातम्या