बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'भूलभुलैय्या.' या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर दुसरा प्रदर्शित झाला होता. या दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे. या भागात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच एका कार्यक्रमाच विद्या आणि माधुरीने 'अमी जे तोमर 3.0' या गाण्यावर डान्स केला. दरम्यान, विद्या बालन पाय घसरुन पडली आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भूल भुलैया 3 चित्रपटातील 'अमी जे तोमर 3.0' या नव्या गाण्यावर स्टेजवर एकत्र डान्स करत चाहत्यांची मने जिंकली. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये स्टेजवर डान्स करत असताना विद्या बालन पाय घसरुन पडल्याचे दिसत आहे. पण माधुरीने मात्र तिचा डान्स सुरु ठेवला.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विद्या आणि माधुरीचा अतिशय सुंदर डान्स पाहायला मिळत आहे. विद्याने काळ्या रंगाची साडी नेसली आहे तर माधुरीने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. दोघीही अमी जे तोमर या गाण्यावर डान्स करत असतात. अचानक विद्याता पाय घरतो आणि ती पडते. पण विद्या पडली जरी असली तरी ती तितक्याच उत्साहाने पुन्हा उभी राहते. नंतर माधुरीसोबत पुन्हा डान्स करु लागते. त्यांचा परफॉर्मन्स संपताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
विद्या आणि माधुरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, "वाह, जेव्हा ती खाली पडली आणि उठून पुन्हा परफॉर्मन्स देखील पूर्ण केला. पण तिने स्वतःला किती सुंदरपणे सांभाळले आहे. कसली शांत आहेही!" अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत, 'माधुरीचे कौतुक आहे. विद्या पडली तरी तिचे लक्ष गेले नाही. तिने डान्स सुरु ठेवल' असे म्हटले. तिसऱ्या एका यूजरने, "माधुरी मॅडम, तुम्ही विद्या मॅडमला कसे सपोर्ट करता हे पाहून तुम्हाला सलाम" असे म्हटले आहे. एका इन्स्टाग्राम युजरने म्हटले आहे की, "अशाप्रकारे तुम्ही अडखळण्याला पॉवर मूव्हमध्ये रुपांतरित करता."
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित भूल भुलैया ३ हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडीची सांगड आहे. माधुरीसह विद्या, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार आहेत. १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या भूल भुलैया 3 ला रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनकडून बॉक्स ऑफिसवर मोठं आव्हान आहे.