Vidya Balan Birthday : कधीकाळी विद्या बालनला म्हटलं जायचं अपशकुनी! काय होतं कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vidya Balan Birthday : कधीकाळी विद्या बालनला म्हटलं जायचं अपशकुनी! काय होतं कारण?

Vidya Balan Birthday : कधीकाळी विद्या बालनला म्हटलं जायचं अपशकुनी! काय होतं कारण?

Jan 01, 2025 09:48 AM IST

Happy Birthday Vidya Balan : चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनला एकेकाळी हलक्याफुलक्या चित्रपटांच्या ऑफर्स कधीच मिळणार नाहीत, याची काळजी वाटू लागली होती.

Bollywood actress Vidya Balan
Bollywood actress Vidya Balan (AFP)

Happy Birthday Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा वाढदिवस वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला असतो. 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि 'पा' यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनला एकेकाळी हलक्याफुलक्या चित्रपटांच्या ऑफर्स कधीच मिळणार नाहीत, याची काळजी वाटू लागली होती. विद्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी...

विद्या बालनचा जन्म मुंबईतील चेंबूर येथे एका तामिळ कुटुंबात झाला. विद्याने वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल 'हम पांच'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण, विद्याला तिचे करिअर चित्रपटांमध्ये करायचे होते. मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अनेक प्रयत्न करूनही ती अयशस्वी ठरत होती.

अभिनेत्रीला म्हटले गेले अपशकुनी!

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेल्या विद्या बालनला सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तिला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, तिचा हा चित्रपट काही कारणास्तव बंद झाला आणि यासाठी विद्या बालनला जबाबदार धरण्यात आले आणि यासाठी तिला 'अपशकुनी' देखील म्हटले गेले.

Nana Patekar Birthday: दोन वेळच्या अन्नासाठी चित्रपटांचे पोस्टर रंगवायचे नाना पाटेकर! कशी झाली अभिनयात एंट्री?

टीकाही झाली!

'हे बेबी' आणि 'किस्मत कनेक्शन' या चित्रपटांमधील तिच्या वाढलेल्या वजनामुळे आणि तिच्या पेहरावामुळे विद्यावर बरीच टीका झाली होती. यामुळे विद्या इतकी निराश झाली की तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिच्या करिअरच्या सुरुवातीला 'परिणीता' आणि 'मुन्ना भाई...' सारख्या चित्रपटांसाठी विद्याचे खूप कौतुक झाले.

सिल्क स्मिताची भूमिका वाटली कठीण!

विद्याने बॉलिवूडमध्ये 'लगे रहो मुन्ना भाई', 'गुरु' आणि 'सलाम-ए-इश्क' सारखे अनेक हिट चित्रपट केले. पण, २०११मध्ये आलेल्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटाने तिचे नशीब पालटले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विद्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'द डर्टी पिक्चर'मध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारणे तिच्यासाठी थोडे कठीण होते. कारण, दोघांची व्यक्तिरेखा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

विद्या बालनने चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. या दोघांची पहिली भेट फिल्मफेअर अवॉर्ड्सदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी १४ डिसेंबर २०१२ रोजी लग्न केले.

Whats_app_banner