Neeyat Trailer: ‘डिटेक्टिव्ह’ बनलेली विद्या बालन सोडवू शकेल का खुनाचं रहस्य; ‘नीयत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Neeyat Trailer: ‘डिटेक्टिव्ह’ बनलेली विद्या बालन सोडवू शकेल का खुनाचं रहस्य; ‘नीयत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Neeyat Trailer: ‘डिटेक्टिव्ह’ बनलेली विद्या बालन सोडवू शकेल का खुनाचं रहस्य; ‘नीयत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Published Jun 23, 2023 09:23 AM IST

Neeyat Trailer Release: नेहमीच पारंपरिक लूक आणि लांब केसांमध्ये दिसणारी विद्या बालन हिचा एक नवा अवतार यात दिसला आहे.

 Neeyat Trailer
Neeyat Trailer

Neeyat Trailer Release: अभिनेत्री विद्या बालन गुप्तहेर म्हणून पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. विद्या बालनच्या ‘नीयत’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विद्या बालन या चित्रपटात गुप्तहेर बनली आहे. ‘नीयत’ चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. या चित्रपटात विद्या बालनचा एकदम हटके लूक दिसणार आहे. 'नीयत'चा ट्रेलर पाहून चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

अभिनेत्री विद्या बालनने इन्स्टाग्रामवर ‘नीयत’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाची कथा एका खुनाभोवती फिरते. या तपासात अनेक पात्रे संशयाच्या भोवऱ्यात येतात, परंतु विद्या बालनला खरा खुनी शोधण्याचे काम सोपवले जाते. या चित्रपटामध्ये विद्या बालनने मीरा राव नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला, एके नावाचे पात्र, अर्थात राम कपूर आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी एक भव्य पार्टी ठेवतात. परंतु, या पार्टीच्या मध्यातच होस्ट एकेचा मृत्यू होतो.

Adipurush Collection: तिकिटाचे दर कमी करून देखील प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’कडे फिरवली पाठ! पाहा कलेक्शनचे आकडे

आता या हत्येचे गूढ उकलण्याची जबाबदारी विद्या बालनवर अर्थात मीरा राववर येऊन पडली आहे. विद्या सगळ्यांनाच संशयाच्या नजरेने बघत आहे. प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी करत आहे. त्यादिवशी पार्टीत उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचीच चौकशी सुरू होते. यापूर्वी, विद्या बालनने चित्रपटाचा टीझर शेअर केला होता आणि लिहिले होते, 'रहस्य आणि हेतू लवकरच समोर येतील... तुम्ही सोबत राहा'. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आतुरता वाढली होती. टीझरमध्ये विद्या बालनच्या लूकची झलकही पाहायला मिळत आहे.

नेहमीच पारंपरिक लूक आणि लांब केसांमध्ये दिसणारी विद्या बालन हिचा एक नवा अवतार यात दिसला आहे. विद्या बालनचा नवा अवतार चाहत्यांना पसंत पडत आहे. बँग हेअरस्टाईलमध्ये विद्या खूपच सुंदर दिसत आहे. विद्या बालनसोबत ‘नीयत’ या चित्रपटात राम कपूर, निक्की वालिया, दानेश राजवी, शशांक अरोरा, अमृता पुरी, नीरज काबी, प्राजक्ता कोळी, शहाना गोस्वामी आणि राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner