मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली जोडी

सिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली जोडी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 04, 2024 08:53 AM IST

तापसी पन्नू आणि मॅथियास बोई यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

सिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली जोडी
सिक्रेट लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत सोहळ्यातील Video Viral! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली जोडी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. यानंतर आता तापसी आणि मॅथियास बोई यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मात्र, अद्याप यावर तापसी किंवा मॅथियासकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तापसी आणि मॅथियासच्या लग्नाचा संगीत व्हिडीओ व्हायरल!

‘बॉलिवूड बबल’ या सोशल मीडिया अकाऊंटने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तापसी आणि मॅथियासच्या संगीत सोहळ्याचे काही क्षण.’ समोर आलेल्या या पोस्टमध्ये पहिल्या व्हिडीओमध्ये दोन मुली नाचत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तथापि, व्हिडीओ काहीसा अस्पष्ट आहे, त्यामुळे त्या मुलींचे चेहरे नीट स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, यात तापसी आणि तिची बहीण असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये तापसी आणि मॅथियास एकमेकांच्या हातात हात घालून नाचताना दिसले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद! वाचा...

चाहतेही आनंदून गेले

तापसी पन्नू आणि मॅथियास बोई यांच्या लग्नसोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला. एका युजरने या व्हिडीओवर ‘छान कपल’ अशी कमेंट केली. आणखी एका युजरने लिहिले की, ‘ते क्यूट कपल आहे’. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘तापसी आणि मॅथियास तुमचे अभिनंदन’. याआधी तापसी आणि मॅथियासच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये तापसी लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली होती. तसेच, मॅथियासही त्याच्या लग्नाच्या शेरवानीत छान दिसत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही जोडी एकमेकांना हार घालताना दिसली होती. याशिवाय दोघेही एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत आहेत.

विक्रांतचं खरं रूप लीला रेवतीला सांगू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार? वाचा...

शुभेच्छांचा वर्षाव

तापसी पन्नूच्या सिक्रेट लग्नातील या व्हिडीओवर युजर्सनी भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने ‘पंजाबी कुडी, पंजाबी लग्न’, असे लिहिले आहे. तर, दुसऱ्याने लिहिले की, ‘लग्न असेच साधेपणाने करावे’. आणखी दुसरा एक युजर म्हणाला की, ‘खूप सुंदर. ही जोडी देवाने बनवली आहे.’ अशा कमेंट्स आता या व्हिडीओंवर आता पाहायला मिळत आहेत.

WhatsApp channel