मधुचंद्राच्या रात्रीची सीडी चोरीला गेली अन् कल्लोळच माजला! ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर पाहिलात?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मधुचंद्राच्या रात्रीची सीडी चोरीला गेली अन् कल्लोळच माजला! ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर पाहिलात?

मधुचंद्राच्या रात्रीची सीडी चोरीला गेली अन् कल्लोळच माजला! ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर पाहिलात?

Published Sep 12, 2024 06:53 PM IST

Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer: राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर पाहिलात?
‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर पाहिलात?

Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer Out: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता अखेर ट्रेलर रिलीज झाल्याने त्याची कहाणी सर्वांना कळली आहे. विद्या आणि विकीचा कोणता व्हिडिओ आहे, हे समोर आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय मजेशीर आहे.

‘विकी और विद्या का वो वाला वीडियो' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात विकी आणि विद्यापासून होते, जे लग्नानंतर हनिमूनमध्ये आपला व्हिडिओ बनवतात आणि सीडी देखील बनवतात. या दोघांची रोमँटिक स्टोरी सुरू असतानाच त्यांच्या घरात चोरी होते आणि ती सीडीही चोरीला गेल्याचे त्यांच्या समोर येते. आता विद्या आणि विकी त्याची ही सीडी शोधायला बाहेर पडणार आहेत. या दरम्यान विकी एका खुनाच्या प्रकरणातही अडकणार आहे.

जुने चेहरे परतणार!

या चित्रपटाचा ट्रेलर खूप मजेशीर आहे आणि त्यातील संवादही खूप चांगले आहेत. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीचा अभिनयही जबरदस्त दिसत आहे. तर, या चित्रपटात असे २ कलाकारही दिसले आहेत, जे बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसणार आहेत आणि ते म्हणजे मल्लिका शेरावत आणि टिकू तलसानिया. या चित्रपटात मल्लिका पुन्हा एकदा आपली हॉट स्टाईल दाखवणार आहे. विजय राज यांची कॉमेडी आणि संवादही खूप चांगले आहेत.

ट्रेलर पाहून प्रेक्षक झाले खूश!

ट्रेलर पाहून युजर्स सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या ट्रेलरवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘हे वर्ष राजकुमारचं आहे.’ एकाने लिहिले की, ‘तृप्तीचा अभिनयही खूप चांगला वाटत आहे. तिची कामगिरी आता चांगली होत आहे.’ तर, एकाने लिहिले की, ‘विजय राज यांच्या कॉमिक टायमिंगशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही.’

‘विकी और विद्या का वो वाला वीडियो' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर याचे लेखन आणि दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. राजकुमार राव, तृप्ती डिमरी, विजय राज, मल्लिका शेरावत, टिकू तलसानिया, अर्चना पूरण सिंह, राकेश बेदी यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Whats_app_banner