गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या 'टायगर ३' या चित्रपटातील टॉवेल सीनची जोरदार चर्चा रंगली होती. या सीनने सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेकजण या सीनवर कमेंट करताना दिसले होते. आता कतरिनाचा पती विकी कौशनले यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विकी सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सॅम बहादुर' या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याला एका मुलाखतीमध्ये टायगर ३ या चित्रपटातील ‘टॉवेल फाईट’ सीनबाबत विचारण्यात आला. त्यावर विकी म्हणाला, 'मी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेलो होतो आणि आम्ही दोघे चित्रपट पाहत होतो. साहजिकच जेव्हा हा सीन आला तेव्हा तो सीन बघतनाता मी तिच्याकडे झुकलो आणि म्हणालो, मी तुझ्याशी पुन्हा कधीच वाद घालणार नाही. कारण टॉवेल घालून तू मला असे मारावे, असे मला वाटत नाही. तिने घेतलेल्या कठोर परिश्रमांचा मला खरोखर अभिमान वाटतो. तिचे काम पाहणे खूप प्रेरणादायी आहे.'
वाचा: चालू शोमधून काजोलने घेतली एग्झिट? करणवर संतापून दिली धमकी
'टायगर ३' या चित्रपटाच्या कमाईविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात कतरिनासोबत सलमान खान आणि इम्रान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्माने केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले आहेत.