बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात मार्शल सॅम माणेकशा यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशलने 'सॅम बहादुर' या चित्रपटात भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारुन आपल्या अभिनयाचे नाणे किती खणखणीत आहे हे दाखवून दिले होते. त्यात सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी संदीप रेड्डी वांगा यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे 'सॅम बहादुर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.
वाचा: रणबीर कपूरने गुपचूप कतरिना कैफचे फोटो काढले? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!
१ डिसेंबरला प्रदर्शित झालेला सॅम बहादुर हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६ जानेवारी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. ओटीटीवर सॅम बहादूर प्रदर्शित होतो यावर दिग्दर्शिका मेघना गुलजार म्हणाल्या की, हा चित्रपट माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. त्यासाठी सगळ्यांनीच घेतलेली मेहनत प्रचंड होती. मी प्रेक्षकांची आभारी आहे की, त्यांनी सॅम बहादूरला मोठा प्रतिसाद दिला. सॅमची स्टोरी ही अनेकांसाठी मोठी प्रेरणादायी असल्याचे मेघना यांचे म्हणणे आहे.
'सॅम बहादूर' या चित्रपटाला व्यावसायिकदृष्ट्या फारसे यश मिळालेले नाही. या चित्रपटाने फार कमी कमाई केली आहे. पण, या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. 'सॅम बहादूर' हा चित्रपट भारतीय लष्कराचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणकेशॉच्या यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सॅम माणकेशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल चपखल बसला आहे.