सध्या विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटातील तौबा तौबा गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या गाण्यावरील विकीची हूक स्टेप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जेव्हा कतरिनाने विकीची ही स्टेप पाहिली तेव्हा ती काय म्हणाली हे विकीने सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. जेव्हा पासून विकीचे 'तौबा तौबा' गाणे प्रदर्शित झाले तेव्हा पासून त्याच्या या गाण्यामधील हूक स्टेपची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्याची डान्स मूव्ह सर्वांना प्रचंड आवडत आहे. विकीच्या डान्सची तारीफ त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफने देखील केली होती. याविषयी विकीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य केले.
विकिची 'तौबा तौबा' गाण्यामधील हूक स्टेप विकीला प्रचंड आवडली होती. विकीने सांगितले की जेव्हा कतरिनाला 'तौबा तौबा' गाण्याची स्टेप करुन दाखवली तेव्हा ती तिला आवडली. कतरिनाला एखादा डान्स आवडणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही एक अचिवमेंट होती असे विकी म्हणाला. तसेच विकीने पुढे सांगितले की कतरिना अनेकदा विकीला ऑन-स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन सल्ले देत असते.
विकीला या मुलाखतीमध्ये उत्तम डान्सर कोण आहे तू की कतरिना? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत विकी म्हणाला की आमच्या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. कारण माझे एक हिट झालेले गाणे ही गोष्ट लपवू शकत नाही की कतरिना किती उत्तम डान्स परफॉर्मर आहे. 'ती एका वेगळ्या लीगमध्ये आहे. ती जे करत आहे ते खूप चांगले आहे' असे विकी म्हणाला. विकी कतरिनाला त्याचे सराव करतानाचे व्हिडीओ दाखवतो तेव्हा कतरिना त्याला काही गोष्ट कशा असायला हव्या हे सांगते.
वाचा: 'लक्ष्याची खूप आठवण आली', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक
विकी कौशलचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या दोघांसोबत चित्रपटात अमी विर्क देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील 'तौबा तौबा' हे गाणे तुफान हिट होत आहे. या गाण्यासोबतच जानम आणि मेरे महबूह मेरे सनम ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.
संबंधित बातम्या