सध्याच्या बॉलिवूडच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून विकी कौशल ओळखला जातो. त्याने अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसते. आज १६ मे रोजी विकी कौशलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
आज विकी जरी कोट्यवधी रुपयांचा मालक असला तरी त्याच्या जन्म हा मुंबईतील एका छोट्या चाळीत झाला आहे. त्याच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण विकीने कधीही हार मानली नाही. तो सतत मेहनत करत राहिला. आज विकीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे.
वाचा: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण...
विकी कौशलचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शकांपैकी एक आहेत. पण, झगमगाटाच्या या जगात यश मिळवण्याआधी कौशल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात विकी खूप कठीण काळाला सामोरा गेला आहे. विकी कौशलने स्वतः एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले होते. चाळीत जन्म झाल्यावर विकीला खूप काही सहन करावे लागले होते. त्याला शेजारच्या लोकांसोबत बाथरूम शेअर करावे लागत होते. त्याचे संपूर्ण बालपण मुंबईतील एका छोट्याश्या चाळीत गेले होते.
वाचा: Rakhi Sawant Healt Update: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
स्टंट दिग्दर्शक म्हणून यश मिळवण्यापूर्वी विकीच्या वडिलांनी अनेक वर्षे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत. अभिनय क्षेत्र निवडण्याविषयी बोलताना विकी कौशल सांगितले होते की, जेव्हा त्याने त्याच्या आई-वडिलांना अभिनयाची आवड सांगितली, तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित झाले. परंतु, त्याच्या वडिलांनी लगेचच त्याला अभिनेता बनण्याची परवानगी दिली होती. पण काम मिळवण्यासाठी कधीही माझ्या नावाचा वापर करायचा नाही, अशी तंबीही वडिलांनी दिली होती.
वाचा: सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?
विकी कौशलने इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. विकी करिअरसाठी पर्याय शोधत असताना त्याला पदवी शिक्षणानंतर दूरसंचार अभियंता म्हणून नोकरी मिळत होती. पण, त्याला अभिनयात जास्त रस होता. मात्र, अभिनेता होण्यासाठीही त्याला अनेक नकारांना देखील सामोरे जावे लागले. त्याने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘संजू’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या संजय दत्तच्या मित्राची अर्थात ‘कमली’ची भूमिका विशेष गाजली होती. यानंतर विकीचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट तुफान हिट झाला.