Chhaava Movie First Review In Marathi: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट आज ( शुक्रवार, १४ फेब्रुवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असला तरी या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू गुरुवारी समोर आला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात आपल्याला काय आवडले आणि काय आवडले नाही? हे सांगितले. तरण आदर्शने या चित्रपटाला किती स्टार्स दिले आहेत, हे देखील जाणून घेऊयात.
तरण आदर्शने विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला ४.५ स्टार दिले आहेत. चित्रपट समीक्षकाने लिहिले की, 'एका शब्दात सांगायचे तर, छावा हा चित्रपट विलक्षण आहे. या चित्रपटात इतिहास, भावना, उत्कटता, देशभक्ती आणि अॅक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. विकी कौशलने अप्रतिम काम केले आहे. आपल्या पिढीतील एक उत्तम अभिनेता म्हणून तो आपली ओळख पक्के करत आहे.
तरण आदर्श यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे कौतुक केले. 'विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पुरस्कार विजेता अभिनय केला आहे. अक्षय खन्नासोबतचे त्याचे अॅक्शन सीन्स अप्रतिम आहेत. उत्तम अभिनेत्यांच्या यादीत आपले नाव का घेतले जाते, हे अक्षय खन्नाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. रश्मिका मंदानानेही चांगले काम केले आहे.
अॅडव्हान्स बुकिंग सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाची ३ लाख ९० हजार १४ तिकिटे न बुकिंगमध्ये विकली गेली आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ११.०९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड एक्सपर्टच्या मते, 'छावा' पहिल्या दिवशी १८ ते २० कोटींचा बिझनेस करेल, पण ही गती कायम ठेवता येईल का? हे येणारा काळच सांगेल. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट टीझर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र संभाजी महाराज आणि रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट केवळ हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट 2D, आयमॅक्स, 4DX आणि आयसीई स्वरूपात पाहण्याचा पर्याय देखील दिला जात आहे. निर्मात्यांनी पहिल्या दिवशी एकूण ७, ४४६ शो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील बहुतेक स्क्रीन 2D स्वरूपात बुक करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या