बॉलिवूडमधील क्यूट आणि सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलकडे पाहिले जाते. दोन वर्षांपूर्वी १० डिसेंबर रोजी कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. पण तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या दोन दिवस आधी कतरिनाने विकीला चक्क धमकी दिली होती. स्वत: विकीने याबाबत खुलासा केला होता.
विकी अनेकदा त्यांच्या लग्नातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. विकीचे लग्न ठरले तेव्हा तो ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणाच्या तारखा आणि लग्नाच्या तारखा क्लॅश झाल्या होत्या. लग्नाच्या दोन दिवसांनंतर लगेच विकीला कामावर परतावे लागणार होते. जेव्हा कतरिनाला हे कळाले तेव्हा ती चिडली आणि तिने विकीला धमकी दिली.
वाचा: वडिलांचे नाव फ्रँक हैंड्रिच पण दिया लावते ‘मिर्झा’ आडनाव, काय आहे प्रकरण?
याविषयी सांगताना विकी म्हणाला, “मी माझ्या लग्नापूर्वी चित्रपटाचा अर्धा भाग शूट केला होता आणि त्यानंतर मी माझ्या लग्नासाठी फ्लाइट घेतली. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी ते मला सेटवर बोलवत होते. एकीकडे चित्रपट निर्मात्याकडून दबाव निर्माण केला जात होता आणि दुसरीकडे कतरिनाने धमकी दिली की, दोन दिवसांनी सेटवर जायचे असेल तर लग्न राहूच दे. त्यानंतर मी निर्मात्यांना ‘नाही’ म्हणालो आणि सेटवर लग्नानंतर पाच दिवसांनी गेलो.”
त्यानंतर विकीने कतरिनाशी लग्न केल्यानंतर आयुष्य बदलले असे देखील सांगितले. “लग्न खरोखरच खूप सुंदर होते आणि आपल्यासाठी एक चांगला जोडीदार शोधणे हा खरोखरच एक आशिर्वाद आहे. चांगला जोडीदार असेल तर तुम्हाला घरी परतायची इच्छा होते. ती खूप चांगली आहे. तिच्याबरोबर राहणे आणि आयुष्य एक्सप्लोर करणे खूप मजेदार आहे. मी तिच्यासोबत खूप प्रवास करत आहे, असे काही मी यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते” असे विकी म्हणाला.