Ankita Lokhande kissing video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १७'मधून विकी भैय्या म्हणून प्रसिद्धी मिळालेला विकी जैन घरातून बाहेर आल्यामुळे देखील चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक अशा त्याच्या काही मुलाखती समोर येत आहेत. एका मुलाखतीमध्ये विकीने त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास, प्रोफेशनल लाइफ आणि बऱ्याच गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय त्याने अंकिता आणि नावेदच्या व्हायरल व्हिडीओवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर अंकिता लोखंडे आणि बिग बॉस स्पर्धक नावेद सोलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांजवळ येऊन डान्स करत असतात. तसेच नावेद अंकिताला किस करतो. हा व्हिडीओपाहून सर्वजण चकीत झाले होते. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत अंकिताला चांगलेच सुनावले होते. आता अंकिताचा पती विकी जैनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: प्रियांका चोप्रावर आर्थिक संकट, गहाण ठेवला १४९ कोटी रुपये किंमत असलेला ‘हा’ बंगला?
विकीने नुकताच टेलीचक्करला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो व्हिडीओबाबत म्हणाला की, 'मी अजिबात इनसिक्योर झालो नाही. नावेद त्याच्या निवडींसाठी कायमच ओपन राहिला आहे. तो सतत हे बोलायचे त्यामुळे त्याचा आणि अंकिताचा एक वेगळा बाँड झाला. आम्ही एक वेगळे कपल आहोत. आम्ही जसे आहोत तसेच राहातो. आम्ही जास्त विचार करत नाही आणि त्यामुळेच वाद निर्माण होतात. लोक आम्हाला जज करतात. चांगली गोष्ट म्हणजे आमच्या दोघांच्यामध्ये सर्वकाही ठिक आहे आणि आम्ही एकमेकांच्या गोष्टींना पाठिंबा देतो.'
विकीला या मुलाखतीमध्ये आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की बिग बॉसच्या घरात जाण्याचा पश्चाताप होत आहे का? कारण आधी अंकिता सतत पाठिंबा दिल्यामुळे हिरवा झेंडा म्हणायचे पण बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे तुला लाल झेंडा बोलू लागले आहेत. यावर उत्तर देत विकी म्हणाला की, 'मला असे वाटते की लोकांना तुम्हाला पाहायचे असते. कोणाचीच इच्छा नसते की त्यांच्या आयुष्यात कोणतेही अडथळे यावेत. आमच्या दोघांमध्ये जेव्हा अडचणी येत होत्या तेव्हा लोक देखील दुखी होती. आता बिग बॉसच्या घरात थोडे वेगळे वातावरण असते. या घरात तुमच्या नात्याचा सगळ्यात वाईट भाग तुम्हाला कळतो. असे नाहीये पण बिग बॉसच्या घरात जे झाले ते नव्हते व्हायला पाहिजे. शोमुळे मला प्रेम मिळाले त्यामुळे वाईट वाटत नाही.'