Vikram Gokhale Cremation: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikram Gokhale Cremation: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Vikram Gokhale Cremation: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Published Nov 26, 2022 09:53 PM IST

Vikram Gokhale passes away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर संध्याकाळी सात वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज (२६ नोव्हेंबर) दुपारी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी सात वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विक्रम गोखलेंच्या निधनामुळे अभिनयाचं एक पर्व हरपल्याची भावना मनोरंजन विश्वातून व्यक्त केली जात आहे. अजूनही विक्रम गोखले अभिनयाच्या क्षेत्रात सक्रीय होते. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्वसामान्यांनी गर्दी केली होती. चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते किशोर कदम, अभिनेता सुबोध भावे यांच्यासह मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक जण विक्रम गोखले यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी मराठीच नाही तर बॉलीवूडमध्येही महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. १९७१ मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. गेल्या ४० वर्षात त्यांनी अनेक भूमिक अजरामर केल्या.

Whats_app_banner