मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar:'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शुटिंगला सुरुवात होताच अक्षयने केली पोस्ट, फोटोची चर्चा
अक्षय कुमार
अक्षय कुमार (HT)

Akshay Kumar:'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शुटिंगला सुरुवात होताच अक्षयने केली पोस्ट, फोटोची चर्चा

06 December 2022, 11:29 ISTAarti Vilas Borade

Vedat Marathe Veer Daudale Saat : या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर आणले आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'वेडात मराठे वीर दौडले सात.' या चित्रपटात शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होताच अक्षय कुमारने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चित्रीकरणास सुरुवात केल्याचे सांगितले आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून आशिर्वाद घेत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने, 'आज मराठी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करत आहे. या चित्रपटात मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारायला मिळणे हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. तुमचा आशिर्वाद कामय माझ्यासोबत राहू द्या' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: ही नवीन ‘नग्नता’ का?; मोदींचे फोटो शेअर करत प्रकाश राज यांचे ट्वीट

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राचा इतिहास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मराठी चित्रपट, मराठी कथानक आणि अनेक मराठी कलाकारांची फौज असतानानाही या चित्रपटात अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटातून अक्षय मराठीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

विभाग