Akshay Kumar: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर आणले आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'वेडात मराठे वीर दौडले सात.' या चित्रपटात शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा चित्रपटातील लूक समोर आला आहे.