मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved New Song: सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं? पाहा व्हिडीओ

Ved New Song: सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं? पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 24, 2023 12:14 PM IST

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा वेड हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण चित्रपटात सत्या आणि श्रावणीचं पुढे काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता प्रदर्शित झालेल्या गाण्यातून ते स्पष्ट झाले आहे.

वेड
वेड (HT)

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या मूल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं 'वेड' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. मात्र, चित्रपटात सत्या आणि श्रावणीचं पुढे काय होतं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता रितेशने गाणे प्रदर्शित करत याबाबत माहिती दिली आहे.

वेड चित्रपटाच्या टीमने 'वेड तुझे..' या गाण्याचे नवे व्हर्जन प्रदर्शित केले आहे. या गाण्यात सत्या आणि श्रावणीचे पुढे काय होते? ते दोघे एकत्र येतात की वेगळं होण्याचे ठरवतात हे स्पष्ट केले आहे. सध्या सर्वत्र रितेश आणि जिनिलियाच्या या गाण्याची चर्चा रंगली आहे.
वाचा: नवाजुद्दीनच्या पत्नी विरोधात आईनेच केली तक्रार, चौकशीसाठी पोलिसात हजर

मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या 'वेड' चित्रपटामुळे घडून आली आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर अगदी बॉलीवूड, टॉलीवूडमध्ये देखील हे घडलं नव्हतं. पण 'वेड' चित्रपटात आता सत्या(रितेश देशमुख) आणि श्रावणी(जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं 'वेड तुझे..' या गाण्याचं नवं व्हर्जन सामिल करण्यात आले आहे. सोबतच काही नवे सीन्सही टाकण्यात आले आहेत.

वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जाणू काही जादूच केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग